पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरातील मूर्तींची तोडफोड आणि धर्मग्रंथ जाळला

पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून कारवाई करण्याचा आदेश

  • पाकची निर्मिती झाल्यापासून तेथे असेच घडत आले असल्यामुळेच आता तेथे हिंदू केवळ नावाला शिल्लक राहिले आहेत; मात्र तरीही इम्रान खान वर तोंड करून ‘भारतात असहिष्णुता वाढली असून अल्पसंख्यांकांचे रक्षण कसे करायचे, हे आम्ही दाखवून देऊ’, असे म्हणत आहेत. प्रत्यक्षात तेथे काय घडत आहे, हेच या घटनेतून पुन्हा समोर आले आहे !
  • इम्रान खान यांनी केवळ कारवाईचा आदेश देण्यापेक्षा आतापर्यंत पाकमध्ये जितकी मंदिरे तोडण्यात आली किंवा त्यांच्यावर अतिक्रमण करून ती बळकावण्यात आली, ती पुन्हा उभारून अथवा मुक्त करून हिंदूंच्या कह्यात देण्याचे धाडस दाखवावे !

(हे छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)

नवी देहली – पाकमधील खैरपूर येथील कुम्ब मंदिरामध्ये तोडफोड करण्यात आली. या वेळी हिंदूंचा धर्मग्रंथही जाळण्यात आला, तसेच मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. ‘असे कृत्य करणे पवित्र कुराणच्या शिकवणीच्या विरोधात आहे’, असे ट्वीट त्यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF