(म्हणे) ‘भारतीय सैन्याधिकारी काश्मिरी युवकांच्या गळ्यात बंदूक घालून छायाचित्र काढतात !’- मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

राष्ट्रघातकी मेहबूबा मुफ्ती यांना मुख्यमंत्री बनवून काश्मीरमधील सत्ता उपभोगणारा भाजप भारतीय सैन्यावर आरोप केल्यावरून त्यांना कारागृहात डांबण्याची शक्यता नाहीच !

मेजर रोहित शुक्ला

नवी देहली – श्रीनगरमध्ये एका तरुणाला सैन्याने त्याच्या तळावर बोलावले. त्यानंतर मेजर रोहित शुक्ला यांनी त्याला मारहाण केली. तसेच त्याला गळ्यात बंदूक घालून छायाचित्र काढण्यासाठी दबाव आणला आणि असे न केल्यास चकमकीत ठार करण्याची धमकी दिली, असा आरोप पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.

मेहबूबा म्हणाल्या की, हे कसले सैनिक आहेत, जे आपल्याच लोकांवर अत्याचार करत आहेत. हे शौर्य नाही. (भारतीय सैनिकांच्या शौर्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी कधी कौतुक केले आहे का ? भारतीय सैनिकांवर दगडफेक करणे, त्यांना धक्काबुक्की करणे, तसेच आतंकवाद्यांना साहाय्य करणे, हे शौर्य आहे का ? – संपादक) याचे उत्तर मेजर शुक्ला यांनी दिले पाहिजे. त्यांची चौकशी झाली पाहिजे. याविषयी मी वरिष्ठ सैन्याधिकार्‍यांशी चर्चा करीन.


Multi Language |Offline reading | PDF