सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुतेज लखलखले !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, आमदार टी. राजासिंह आणि श्री. मनोज खाडये

सोलापूर – येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार टी. राजासिंह, सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये या मान्यवर वक्त्यांच्या हिंदुत्वाच्या हुंकाराने येथील जय भवानी प्रशालेचे मैदान दणाणून गेले. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि अन्य वक्ते यांंच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF