सामर्थ्याची जाणीव करून देई हातातील तळपती तलवार ।

कृष्णा, तू ठेवल्यास ना, एका म्यानेत दोन तलवारी ? ।
पांडुरंगा, तूही ठेवल्यास ना एका म्यानेत दोन तलवारी ? ॥ १ ॥

सांगू का देवराणा,
तलवार म्यानेत रहाते; पण ती खरी हातातच शोभते ।
‘शिवबा’ असोत, ‘बाजीप्रभु’ अथवा ‘कल्की अवतार’ असो ।
हातातल्या तलवारीनेच तो हात शोभतो ।
अन् सामर्थ्याची जाणीवही करून देतो ।
म्यानेतल्या तलवारीने कंबरेची का शोभा वाढते ? ॥ २ ॥

खरे ना देवा ?
तू ‘शिव’ होता, मी ‘त्रिशूल व्हावे ।
तू ‘कृष्ण’ होता, मी ‘सुदर्शन’ व्हावे ॥ ३ ॥

तू ‘राम’ होता, मी ‘शिवधनू’ व्हावे ।
तू ‘शिवबा’ होता, मी ‘समशेर’ व्हावे ॥ ४ ॥

सांग देवा, मला असे का वाटावे ? ।
सांग देवा, मला असे का वाटावे ? ॥ ५ ॥

सर्व देवांची शस्त्रे त्यांच्या हातांत आहेत. ती म्यानेत झाकून ठेवलेली नाहीत; कारण म्यानेत त्यांना गंज चढतो.’

– पुष्पांजली, बेळगाव (२४.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF