साधकांचा श्‍वास आहात तुम्ही परम पूज्य ।

साधकांमध्ये मोक्षप्राप्तीची तळमळ निर्माण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सौ. राजलक्ष्मी जेरे

साधकांचा श्‍वास आहात
तुम्ही परम पूज्य ।
साधकांचा प्राणही तुम्हीच
परम पूज्य ॥ १ ॥

तुमच्या स्मरणाने
दिवस चालू होतो साधकांचा ।
तुमच्याच नावाने
शेवटही होतो दिवसाचा ॥ २ ॥

तुमच्याच विचारांत अखंड असती साधक ।
अन् साधकांच्या विचारांत असता तुम्ही ॥ ३ ॥

तुमच्याविना साधकांचे पानही हलत नाही ।
तुमच्यापाशी येण्याविना दुसरे कुठले ध्येयही दिसत नाही ॥ ४ ॥

– सौ. राजलक्ष्मी जेरे, सॅन दिएगो, अमेरिका. (९.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF