भृगु महर्षींनी जीवनाडीपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हळद लावतांना आलेल्या अनुभूती

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी भूमी मिळण्यातील अडथळे दूर होण्यासाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये भृगु महर्षींनी जीवनाडीपट्टीमध्ये एक उपाय सांगितला. त्यामध्ये त्यांनी सांगितले, ‘कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या मासांतील (महिन्यांतील) ‘शततारा’ नक्षत्र असलेल्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगाला हळद लावावी.’ कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या मासांतील शततारा नक्षत्र असलेले दिवस अनुक्रमे १७ नोव्हेंबर २०१८, १४ डिसेंबर २०१८ आणि १० जानेवारी २०१९ हे होते. त्या तिन्ही दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगाला पाण्यात कालवलेली हळद आंब्याच्या पानांनी लावली आणि मी ती त्यांच्या अंगावर सर्वत्र पसरली. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अंगाला हळद लावतांना तिन्ही वेळा माझे देहभान हरपले आणि मन निर्विचार झाले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हळद लावल्यावर पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या उजव्या तळहातापेक्षा डाव्या तळहाताचा रंग अधिक प्रमाणात टिकणे आणि उजव्या तळहातापेक्षा डावा तळहात अधिक प्रमाणात गुळगुळीत होणे, यांमागील शास्त्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

हळद लावून झाल्यावर काही वेळाने मी माझ्या दोन्ही तळहातांची तुलना केल्यावर मला पुढील गोष्टी लक्षात आल्या.

अ. मी दिवसभरात अनेक वेळा दोन्ही हात धुऊनही माझ्या उजव्या तळहातापेक्षा डाव्या तळहाताला हळदीचा पिवळा रंग अधिक प्रमाणात टिकला होता.

आ. साधकांना माझ्या उजव्या तळहातापेक्षा डावा तळहात अधिक गुळगुळीत जाणवत होता.

या दोन्ही निरीक्षणांचे विश्‍लेषण करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘डाव्या हातापेक्षा उजवा हात अधिक कार्यरत असल्याने उजव्या तळहाताचा हळदीचा पिवळा रंग लवकर निघून गेला. तसेच दोन्ही तळहातांना हळद पसरवण्याच्या माध्यमातून सारख्याच प्रमाणात स्पंदने मिळूनही उजवा हात अधिक कार्यरत असल्याने त्याला मिळालेली स्पंदने वातावरणात लवकर प्रक्षेपित होऊन निघून गेली आणि डाव्या हाताची अधिक वेळ टिकली. त्यामुळे डावा हात अधिक गुळगुळीत लागत आहे.’’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हळद लावल्यावर त्यांच्या अंगाने हळदीची स्पंदने ग्रहण करण्याच्या प्रमाणानुसार पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या तळहातांना हळदीचा रंग टिकण्याच्या कालावधीत पालट होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष हे ३ मास (महिने) हळद लावल्यावर त्या प्रत्येक मासात माझ्या दोन्ही तळहातांना लागलेल्या हळदीचा रंग टिकण्याचा कालावधी पुढीलप्रमाणे होता.

वरील सारणीवरून लक्षात येते की, पहिल्या मासात जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अंगाला हळद लावली, तेव्हा ती त्यांच्या अंगाने अल्प प्रमाणात ग्रहण केली. त्यामुळे ती माझ्या तळहातांना अधिक काळ टिकली. या तुलनेत जेव्हा तिसर्‍या मासात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अंगाला हळद लावली, तेव्हा ती त्यांच्या अंगाने सर्वाधिक प्रमाणात ग्रहण केली. त्यामुळे ती माझ्या तळहातांवर अल्प प्रमाणात टिकली. याची प्रचीती मला ‘त्या मासात माझे दोन्ही तळहात अल्प प्रमाणात पिवळे झाले होते’, यावरूनही मिळाली. यातून ‘देवाचे कार्य काळाप्रमाणे कसे चालते’, हे समजते.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now