लोटे येथे सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत मूक आंदोलन शांततेत पार पडले

पोलिसांंच्या अन्यायी कारवाईच्या विरोधात उत्तर रत्नागिरीतील हिंदू एकवटले

  • लोटे येथील गोवंशियांचे हत्या प्रकरण

  • दापोली, खेड, चिपळूण आणि संगमेश्‍वर बाजारपेठा कडकडीत बंद

  • खेडच्या उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

खेड, ५ फेबु्रवारी (वार्ता.) – गोमाता हे हिंदूंचे दैवत आहे. गोहत्या हा आम्हा हिंदूंसाठी संवेदनशील विषय आहे. हिंदूंच्या धर्मभावनांवर आघात करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला सर्व पक्ष, संघटना, जाती, संप्रदाय आदी भेद विसरून हिंदू प्रतिकार करतील, हेच लोटे येथील गोवंशियांच्या हत्या प्रकरणाने सिद्ध केले आहे. पोलीस यंत्रणेवर हात उगारणे, हे निषिद्ध असले, तरी पोलिसांचा अन्यायही जनता आता सहन करणार नाही, हेच संयमपूर्ण मूक आंदोलनाने दाखवून दिले, असे प्रतिपादन मूक आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि संघटना यांच्या प्रतिनिधींनी केले. लोटे येथे गोवंशियांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अन्याय्य कारवाईच्या विरोधात ४ फेब्रुवारीला लोटे ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी लोटे दशक्रोशीतील सहस्रो ग्रामस्थांनी मूक आंदोलन केले.

या आंदोलनाच्या वेळी लोटे दशक्रोशीतील नागरिकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. हे निवेदन खेड येथील उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी स्वीकारले. निवेदन स्वीकारल्यानंतर उपविभागीय अधिकारी सोनोने यांनी ‘जनतेच्या भावना जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून शासनाकडे पोहोचवण्यात येतील’, असे आश्‍वासन दिले. हे निवेदन दिल्यानंतर आंदोलनासाठी जमलेले हिंदु बांधव शांततेने आपापल्या गावी परतले.

खेड येथील उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांना निवेदन देतांना सरपंच सौ. आरती काते, तसेच दशक्रोशीतील महिला आणि पुरुष प्रतिनिधी

प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत एकजूट कायम ठेवणार !

मूक आंदोलनानंतर पुढील प्रक्रियेसाठी सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय

मूकआंदोलनानंतर सर्वपक्षीय नेते आणि निवडक ग्रामस्थ यांची गोवंशियांच्या हत्या प्रकरणाच्या पुढील प्रक्रियेसाठी लोटे ग्रामपंचायतीच्या सभागृहात बैठक झाली. या वेळी प्रामुख्याने घटनेतील संभाव्य पोलीस कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रिया यांविषयी चर्चा करण्यात आली. यापुढेही या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत एकजूट कायम टिकवून ठेवायची, असे मनोगत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी जाधव आणि अधिवक्ता आनंदराव भोसले, खेड नगराध्यक्ष मनसेचे वैभव खेडेकर, भाजपचे शशिकांत चव्हाण आणि रामदास राणे, शिवसेनेचे बाळा कदम, वारकरी संप्रदायचे अभय सहस्रबुद्धे, डॉ. प्रशांत पटवर्धन, हिंदु जनजागृती समितीचे सुरेश शिंदे, लोटे भागाचे सरपंच सौ. आरती काते आदींसह दशक्रोशीतील मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

गोहत्या प्रकरणी पोलीस यंत्रणेने हिंदूंवर केलेल्या अन्याय्य कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ संघटित झाल्याने हिंदूसंघटनाचा आविष्कार साकार झाला.

‘लाठीमार करणार्‍या पोलिसांवर कारवाई होईपर्यंत आणि अन्याय्य कारवाई झालेल्या सर्व हिंदु बांधवांची सुटका होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही’, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

या मूक मोर्च्याला वृत्तप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस कुमक मोठ्या प्रमाणात नियुक्त करण्यात आली होती.

  • हिंदूंचे आंदोलन संयमपूर्ण आणि शांततेत असते, हेच या आंदोलनातून सिद्ध होते !
  • हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात संघटित झालेली हिंदु शक्तीच आता कोणताही संघर्ष करील !
  • हिंदूंनो, केवळ गोहत्या नव्हे, तर तुमच्यावर अन्य पंथियांकडून होणारे लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, धर्मांतर यांसारख्या आघातांना विरोध करण्यासाठी असेच संघटित रहा !


Multi Language |Offline reading | PDF