गोहत्येचा प्रयत्न करणार्‍या ३ आरोपींना अटक ! – पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे

  • शासनकर्त्यांना बंद, आंदोलन, उपोषण यांचीच भाषा समजते, तशी पोलिसांनाही जनतेने केलेल्या उद्रेकाची भाषा समजते, असे म्हणायचे का ?
  • जनतेने तक्रार करूनही हात-पाय न हालवणारे पोलीस, तिचा उद्रेक झाल्यावर मात्र आरोपींना पकडल्याचे दर्शवतात !
  • असे कामचुकार नव्हे, तर कर्तव्यदक्ष पोलीस आता केवळ हिंदु राष्ट्रातच मिळतील, यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्र येण्यासाठी संघटित व्हावे !

खेड – तालुक्यातील धामणदेवी या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाजवळ जंगलाच्या परिसरात गोहत्येचा प्रयत्न करणार्‍या ३ आरोपींना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, बाजीराव पाटील, शिरीष सासने आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील पीरलोटे येथे २६ जानेवारीला गोवंशियांच्या हत्येच्या संशयावरून शेकडोंचा जमाव आणि पोलीस यांच्यात उद्रेक झाला होता. या वेळी जमावाने पोलिसांना मारहाण करून वाहनांची जाळपोळ केली. याप्रकरणी ३०० जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांकडून निषेधाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आता ३ आरोपींना अटक केली आहे.

पत्रकार परिषदेत डॉ. मुंढे म्हणाले…

१. २५ जानेवारी या दिवशी तुषार शांताराम गोवळकर, अनिश आंब्रे, संकेत हुमणे आणि प्रशांत चाळके हे ग्रामस्थ परिसरात फिरत असतांना त्यांना ५ जण ‘स्कॉर्पिओ’ गाडीसह संशयास्पद हालचाली करतांना दिसले. ग्रामस्थांची चाहूल लागताच संशयितांनी बंदुकीचा धाक दाखवत तेथून पळ काढला. ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला; मात्र ते सापडले नाहीत. ग्रामस्थांनी परिसराची पाहणी केली असता तेथे एक बैल आणि एक गाय बांधून ठेवल्याचे दिसून आले.

२. हा गोहत्येचा प्रकार आहे, हे लक्षात आल्यानंत तुषार शांताराम गोवळकर यांच्यासह ग्रामस्थांनी याविषयी खेड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा (सुधारणा कायदा) २०१५ चे कलम ५  (अ), (ब), ८ सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ३२५ प्रमाणे गुन्हा नोंद केला होता. यानंतर पोलिसांनी शमशुद्दीन इस्माईल खेरटकर (वय ३० वर्षे), पांडुरंग जयराम कदम (वय ५० वर्षे) आणि संतोष लक्ष्मण गमरे (वय ४८ वर्षे) हे या प्रकरणातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

३. यातील संशयित शमशुद्दीन हा गावोगावी जाऊन गुरे जमा करायचा अथवा अल्प किमतीत विकत घ्यायचा. ही गुरे संतोष गमरे यांच्या वाहनाने पांडुरंग कदम यांच्या गोठ्यात एकत्र ठेवली जायची. या गोठ्यातून गुरे कत्तल करण्यासाठी पुढे घेऊन जाणारे कसाई वेगळे होते. शमशुद्दीनवर यापूर्वी ३ गुन्हे नोंद आहेत. (धर्मांधांच्या पापात हिंदूंही तेवढेच सहभागी आहेत ! अशा हिंदूंना आपत्काळात कोणी वाचवेल का ? धर्मांधावर एवढे गुन्हे नोंद असतांना पोलीस अशा आरोपीला मोकाट कसे सोडतात, यातून पोलिसांचाही या कृत्यात सहभाग असेल, असे कोणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक)

घटनास्थळी आढळलेल्या बैलाची ओळख पटली असून तो बैल वनिता शाहू अमरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. शमशुद्दीन याने वनिता यांच्याकडून तो विकत घेतला होता.

गोहत्येचा प्रयत्न होता

घटनास्थळी एक गाय आणि एक बैल बांधण्यात आला होता. त्या बैलाला भूल देण्यात आली होती. त्यामुळे तो निपचीत पडला होता. यावरून तिथे गोहत्येचा प्रयत्न होत होता, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गाय, बैल विकतांना विकत घेणारा कशासाठी विकत घेत आहे, याचा शोध घ्यावा, असे आवाहन डॉ. मुंढे यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF