पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यातील सैन्याच्या तळावर रॉकेट लाँचरने आक्रमण

भारताकडून जीवितहानी होईल म्हणून प्रत्युत्तर नाही !

  • शत्रूराष्ट्र भारताची जीवितहानी करण्याचा प्रयत्न करते, तर भारत ‘पाकची जीवितहानी होऊ नये’, याचा विचार करतो. असा विचार करणारा भारत स्वतःचा आत्मघात केल्याविना रहाणार नाही !
  • पृथ्वीराज चौहान याने १७ वेळा महंमद घोरी याला पराभूत करून सोडून दिले होते; मात्र १८ व्या वेळी घोरी जिंकला आणि त्याने पृथ्वीराज चौहान याला बंदी बनवले आणि नंतर हालहाल करून त्याला ठार मारले, या इतिहासातून काहीही न शिकणारा भारत महासत्ता कधीतरी होईल का ?

पुंछ (जम्मू-काश्मीर) – ५ फेब्रुवारीला येथील नियंत्रणरेषेवरील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्यतळावर  रॉकेट लाँचरद्वारे आक्रमण केले. सकाळी १०.३० च्या सुमारास झुलास भागात हे आक्रमण करण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ‘हे आक्रमण जाणीवपूर्वक चिथावणी देण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याने आणि त्याला प्रत्युत्तर दिल्यास पाकमध्ये जीवितहानी होईल म्हणून भारतीय सैन्याने याला प्रत्युत्तर देण्याचे टाळले’, असे सैन्य अधिकार्‍याने सांगितले.

वर्ष २०१९ च्या आरंभापासून जम्मू भागात नियंत्रणरेषेवर पाक सैन्याकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंंघन चालू आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरही शस्त्रसंधी उल्लंंघनाच्या घटना घडल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF