मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखनाथ आखाड्याच्या तंबूला आग; २ तंबू भस्मसात

प्रयागराज (कुंभनगरी), ५ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यातील सेक्टर १५ मधील लोअर मार्गावरील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘महासभा गोरखनाथ आखाड्या’तील २ तंबूंना ५ फेब्रुवारीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत पैसे, कपडे, धारिका आणि तंबू भस्मसात झाले; मात्र आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आखाड्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अध्यक्ष आहेत. त्यांनी २९ जानेवारीला शिबिरातील आराध्य देवाची पूजा करून संत आणि महात्मे यांच्यासमवेत प्रसादही ग्रहण केला होता.


Multi Language |Offline reading | PDF