मनमोकळेपणाने बोलल्यामुळे एस्.एस्.आर्.एफ्.च्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. श्‍वेता क्लार्क यांना आलेल्या अनुभूती

१. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सेवेतील अडचणी आणि लहानपणी घडलेले काही प्रसंग सांगितल्यावर त्यांनी मानसोपचार तज्ञांचे साहाय्य घेण्यास सांगणे

सौ. श्‍वेता क्लार्क

‘मी अध्यात्मप्रसार करण्यासाठी काही दिवस भारताबाहेर गेले होते. प्रसारसेवा करतांना जे काही प्रसंग घडले, तसेच मला ज्या काही अडचणी आल्या, त्यांविषयी मला चिंता वाटत होती. त्यामुळे मी आणि माझे यजमान श्री. शॉन सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला गेलो. मी त्यांना प्रसारकार्यात आलेल्या अडचणी, तसेच माझ्या लहानपणी घडलेले काही प्रसंग, यांविषयी सांगितले. सद्गुरु बिंदाताईंनी या प्रसंगाविषयी मला मानसोपचार तज्ञांचे साहाय्य घेण्यास सांगितले.

२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी बोलल्यावर मन हलके होणे, ‘देवीमाताच साहाय्याला धावून आली आहे’, असे वाटणे आणि मनातील विचार नाहीसे होऊन मन एका शीतल ऊर्जेने भरून गेले असल्याचे जाणवणे

सद्गुरु बिंदाताईंशी मोकळेपणाने बोलल्यामुळे माझे मन पुष्कळ हलके झाले. ‘प्रत्यक्ष देवीमाताच माझ्या साहाय्याला धावून आली आहे’, असे मला वाटत होते. सद्गुरु बिंदाताईंकडून येणार्‍या प्रीतीच्या प्रचंड प्रवाहामुळेे मला चैतन्य मिळाले आणि मला आश्‍वस्त वाटू लागले. माझ्या मनातील सर्व विचार नाहीसे होऊन माझे मन रिकामे झाले. हे रिकामे मन एका शीतल ऊर्जेने भरून गेले होते.

३. मानसोपचार तज्ञांशी बोलतांना ईश्‍वर भूतकाळ पुसून टाकत असल्याचे जाणवून भाव जागृत होणे, ‘प.पू. गुरुदेवांनाच सर्वकाही सांगत आहोत’, असे जाणवणे आणि मानसोपचार तज्ञांकडून चांगली शक्ती प्रवाहित होत असल्याचे जाणवून चैतन्य मिळणे

सद्गुरु बिंदाताईंनी सुचवल्याप्रमाणे मी मानसोपचार तज्ञांना भेटायला गेले. त्यांच्याशी बोलतांना ‘ईश्‍वर माझा भूतकाळ पुसून टाकत आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि सद्गुरु बिंदाताईंचा दैवी सत्संग, यांमुळे माझ्या भूतकाळातील कठीण प्रसंग आणि दु:खे यांना मोकळी वाट मिळत होती. मानसोपचार तज्ञांशी बोलतांना ‘मी प.पू. गुरुदेवांनाच सर्वकाही सांगत आहे’, असे मला वाटत होते. त्यांच्याकडून पुष्कळ चांगली शक्ती माझ्याकडे प्रवाहित होत होती. त्यामुळे मला चैतन्य मिळून माझे मन पूर्णतः हलके झाले होते.

४. मानसोपचार तज्ञांना भेटल्यानंतर ध्यानमंदिरात जाऊन प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केल्यावर आलेल्या अनुभूती

४ अ. ‘छायाचित्रातील प.पू. भक्तराज महाराज यांचे डोळे सजीव झाले असून ते बोलत आहेत’, असे जाणवणे, ‘मनातील सर्व विचार सांगून तू तुझे मन रिक्त केल्याने देव तुझ्या मनात इतर काहीतरी भरेल’, असे त्यांनी सांगणे, त्यानंतर ‘ॐ’चा ध्वनी ऐकू येणे आणि ‘देवाने तुझ्या मनात आकाशतत्त्व भरले आहे’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगणे : मानसोपचार तज्ञांना भेटल्यानंतर मी ध्यानमंदिरात गेले. मी प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केली, ‘प.पू. बाबा, मला आतून हलके वाटत आहे. मी माझे सर्व विचार आपल्या चरणी अर्पण केले आहेत. केवळ मला प.पू. गुरुदेवांची सेवा करायची आहे.’ त्यानंतर मला पुष्कळ शांत वाटू लागले. ‘छायाचित्रातील प.पू. भक्तराज महाराज यांचे डोळे सजीव झाले असून ते माझ्याशी बोलत आहेत’, असे मला जाणवले. प.पू. भक्तराज महाराज मला म्हणाले, ‘तू तुझ्या मनातील सर्व विचार आणि प्रसंग प्रांजळपणे सांगून तुझे मन रिक्त केले आहेस. आता देव तुझ्या मनात इतर काहीतरी भरेल.’ त्यानंतर एक घंटा मला ‘ॐ’चा ध्वनी ऐकू येत होता. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज मला म्हणाले, ‘तुझे मन तू रिकामे केले असल्याने देवाने तुझ्या मनात आकाशतत्त्व भरले आहे.’ त्यांचे हे उद्गार ऐकून माझी भावजागृती झाली.

४ आ. काही वर्षांपूर्वी आईसह प.पू. गुरुदेवांना भेटल्यावर ‘आमच्याकडे तुम्हाला अर्पण करायला काहीही नाही’, असे त्यांना सांगणे आणि ‘तुमचे मन अर्पण करा’, असे त्यांनी सांगितल्याचे आठवणे : मला पूर्वीचा एक प्रसंग आठवला. काही वर्षांपूर्वी मी आणि माझी आई प.पू. गुरुदेवांना भेटायला आलो होतो. त्यांना अर्पण करायला आमच्याकडे काहीही नव्हते. ‘प.पू. गुरुदेव हे ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. आमच्यासारखे क्षुद्र जीव त्यांना काय देणार ?’, असे आम्हाला वाटत होते. प.पू. गुरुदेवांना भेटल्यावर आम्ही त्यांना म्हणालो, ‘‘आमच्यासारखे अपवित्र जीव आपल्याला काय अर्पण करणार ? आमच्याकडे तुम्हाला अर्पण करायला काहीही नाही.’’ यावर ते म्हणाले, ‘‘तुम्हाला मला जर काही अर्पण करायचेच असेल, तर तुमचे मन अर्पण करा.’’

४ इ. चुकांची भीती वाटत असल्याचे प.पू. भक्तराज महाराज यांना सांगणे आणि त्यावर ‘सहसाधकांनी सांगितलेल्या चुका आणि सूत्रे मनापासून स्वीकारल्यास आपले सर्वस्व गुरूंच्या पवित्र चरणी अर्पण करता येईल’, असे त्यांनी सांगणे : हा प्रसंग मला प.पू. बाबांमुळे (प.पू. भक्तराज महाराज यांच्यामुळे) आठवला. मी रडत-रडतच त्यांना आळवू लागले, ‘प.पू. गुरुदेव, माझ्यात स्वतःचे मन अर्पण करण्याची क्षमता नाही. मला चुकांची भीती वाटते. केवळ सद्गुरु बिंदाताईंच्या सत्संगामुळेच मी मनमोकळेपणाने बोलू शकले.’ माझे हे आर्त निवेदन ऐकून प.पू. बाबा मला म्हणाले, ‘साधक चुका सांगतात किंवा तुझ्याकडून चुका होतात’, याची भीती बाळगू नकोस. ‘सध्या गुरुदेवांची सेवा करण्याची तुझी क्षमता ४० टक्के एवढीच आहे’, असे समज.  सहसाधक तुला तुझ्या चुका सांगतील. जर तू त्या चुका स्वीकारले गेल्यास आणि त्यांनी सांगितलेली सूत्रे विचारात घेऊन सेवा केलीस, तर तू प.पू. गुरुदेवांची १०० टक्के सेवा करू शकशील. त्यामुळे सहसाधक सांगत असलेल्या प्रत्येक सूत्राची नोंद करून ठेव. तुला तुझे मन, शरीर आणि बुद्धी प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायचे आहे ना ? मग सहसाधकांनी सांगितलेल्या चुका आणि सूत्रे मनापासून स्वीकारलीस, तरच तू तुझे सर्वस्व गुरूंच्या पवित्र चरणी अर्पण करू शकशील. सहसाधकांनी चुका सांगितल्यावर घाबरून न जाता त्यांतून शिकून पुढे जा.’ त्या वेळी वातावरणात सर्वत्र पांढरा प्रकाश पसरला होता.

५. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा सत्संग मिळाल्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !

सद्गुरु बिंदाताईंनी मला दिलेल्या दैवी सत्संगासाठी मी त्यांच्या पवित्र चरणी कोटी-कोटी कृतज्ञता व्यक्त करते. या प्रसंगातून संतांच्या सत्संगाचे महत्त्व माझ्या लक्षात आले. संतांमध्ये असलेल्या प्रीतीमुळेच ते आपल्या साधनेला योग्य दिशा देतात आणि आपल्याकडून साधना करवून घेतात. सद्गुरु बिंदाताईंच्या सत्संगामुळेच ‘आपण खर्‍या अर्थाने प.पू. गुरुदेवांची सेवा कशी करू शकतो’, याची मला जाणीव झाली. कृतज्ञता !’

– सौ. श्‍वेता क्लार्क, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF