भुसावळ (जळगाव) येथील गोप्रेमींचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन !

चंद्रपूर आणि रत्नागिरी येथील निंदनीय घटनांचा निषेध !

गोप्रेमींना असे निवेदन द्यावे लागणे, हे भाजप सरकारसाठी लज्जास्पद !

प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देतांना गोप्रेमी

जळगाव, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि रत्नागिरी येथे गोप्रेमींवर झालेल्या अन्याय्य कारवाईचा निषेध करत भुसावळ येथील गोप्रेमींनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर केले.

चंद्रपूर येथे गोतस्करी थांबवण्यासाठी गेलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर उन्मत्त धर्मांध कसायांनी गाडी घातली. त्यात त्यांना प्राण गमवावे लागले. त्याचप्रमाणे रत्नागिरीमधील लोटे गावात अवैध पशूवधगृह चालू असल्याची माहिती करून देण्यास गोप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी जनता गेली असता त्यांच्यावर पोलिसांनी अमानुष लाठी आक्रमण केले आणि उलट गोसेवकांवरच गुन्हे नोंदवले. या दोन्ही घटना अतिशय निंदनीय आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

एवढी निंदनीय घटना घडली असतांनाही काही प्रसारमाध्यमे आणि ढोंगी पुरोगामी याविषयी शांत आहेत. असे असतांना भुसावळ येथील गोप्रेमींनी ४ फेब्रुवारी या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर केले. ‘राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असतांना सर्रासपणे होणार्‍या गोतस्करीविषयी शासन-प्रशासन एवढे उदासीन का ?’, असा प्रश्‍न गोप्रेमींनी विचारला. उपरोक्त घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी आणि खर्‍या अर्थाने न्याय मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. प्रांताधिकार्‍यांच्या वतीने दिलीप बारी यांनी निवेदन स्वीकारले.


Multi Language |Offline reading | PDF