तिरुपती मंदिरातून सोन्याचे ३ मुकुट गायब

मंदिर सरकारीकरण झालेल्या मंदिरांची ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

तिरुपती (आंध्रप्रदेश) – तिरुपतीच्या श्री गोविंदराज स्वामी मंदिरातून सोन्याचे १ किलो ३०० ग्रॅम वजनाचे ३ मुकुट गायब झाले आहेत. प्राचीन मंदिरात भगवान व्यंकटेश, श्री लक्ष्मी आणि श्री पद्मावती यांच्या मूर्तींवर हे मुकुट चढवले होते. २ फेब्रुवारीच्या रात्रीपासून ते गायब झाल्याचे तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले. चोरांचा शोध घेण्यासाठी मंदिर परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासण्याचे काम चालू आहे. देवस्थानने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यानंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF