धर्मप्रेमी हिंदूंवर अन्याय झाल्यास हिंदु विधीज्ञ परिषद त्यांच्या साहाय्यासाठी ठामपणे उभी राहील !  अधिवक्ता संजीव पुनाळेकर

गोरक्षक वैभव राऊत आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात नालासोपारा येथे एकवटले १ सहस्रहून अधिक धर्मप्रेमी !

नालासोपारा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – धर्मप्रेमी गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्थानिक हिंदु बांधव मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. अशा प्रकारचे संघटन २००८ मध्ये साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांच्या अटकेच्या निषेधार्थ दाखवले असते, तर २००९ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असते. धर्मप्रेमी हिंदूंना अशा प्रकारे कोणत्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यांच्या साहाय्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद ठामपणे उभी राहील, असे आश्‍वासन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी दिले. नालासोपारा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या जवळील पटांगणावर हिंदू गोवंश रक्षा समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.

श्री. दीप्तेश पाटील

सभेच्या प्रारंभी पुरोहित श्री. विजय जोशी यांनी शंखनाद केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पुरोहित सर्वश्री विजय जोशीगुरुजी, विठ्ठलगुरुजी आणि गोविंद भालेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. सूत्रसंचालन श्री. प्रसाद काळे यांनी केले. हिंदू गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील हिंदु गोवंश रक्षा समितीच्या कार्याची माहिती दिली. या सभेला १ सहस्रहून अधिक हिंदू उपस्थित होते. ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे या सभेच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ १ सहस्र २०० धर्मप्रेमींनी घेतला.

या वेळी अधिवक्ता पुनाळेकर पुढे म्हणाले की, पुरोगामित्वाच्या नावाखाली मनुस्मृती जाळणारे, जातीव्यवस्थेच्या विरोधात बोलणारेच आज जातीव्यवस्थेला खतपाणी घालण्याचे काम करीत आहेत. जनतेला लुटून स्वत:ची घरे भरणार्‍या राज्यकर्त्यांना कठोर शासन करण्याचे कायदे हिंदु राष्ट्रात निर्माण केले जातील. हिंदू कधीही पोलीस किंवा सैन्य यांवर आक्रमण करत नाहीत. आज देशाची परिस्थिती एवढी भयावह झाली आहे, की भविष्यात जनता क्रांतीसाठी रस्त्यावर उतरल्याविना रहाणार नाही. ही संधी साधून जिहादी आणि नक्षलवादी देशाची सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा गंभीर परिस्थितीत पोलीस आणि प्रशासन यांचे साहाय्य मिळाले नाही, तर हिंदूंना त्यांच्यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी हातात शस्त्र घेणे अपरिहार्य होईल.

गोवंश हत्याबंदी कायदा असतांना गोहत्या होतातच कशा ? – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

गोरक्षक श्री. वैभव राऊत यांसह काही हिंदूंना अटक करण्यात आली, तेव्हा पुन्हा एकदा ‘भगवा आतंकवाद’, ‘हिंदु आतंकवाद’ यांसारखे शब्द प्रसिद्धीमाध्यमांतून उच्चारले जाऊ लागले. वर्ष १९९३ मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, २६/११ चे मुंबईवरील आक्रमण यांमागे कोणत्या रंगाचा आतंकवाद होता, हे माध्यमांतून का सांगितले जात नाही ? गोरक्षकांना गुंड म्हणून संबोधले जाते, त्यांच्यावर तडीपारीसारखे गुन्हे नोंदवले जातात. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या संतवचनानुसार धर्मप्रेमींना गुंड संबोधत असाल, तर ‘हो, आम्ही गुंड आहोत’. हिंदूंचे सण, उत्सव यांच्या वेळी ध्वनीप्रदूषणाच्या कायद्याचे कारण देत ध्वनीक्षेपक बंद करायला लावणारे मशिदींवरील अवैध भोंग्याच्या विरोधात कारवाई का करीत नाहीत ?

… मग आतंकवादी याकूब मेमन याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या लोकांविषयी प्रसिद्धीमाध्यमांना प्रश्‍न का पडत नाही ? – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

धर्मकार्य करणार्‍या प्रत्येक संघटनेवर आज आघात होत आहेत. या आघातांना विरोध करण्यासाठी जो योद्धा उभा रहातो, तो प्रत्येक योद्धा आमचा आहे. या भागात अवैधपणे रहाणारे नायजेरीयन, ‘बीफ माफिया’ यांच्या विरोधात आंदोलने करून हिंदूंना संघटित करणारे गोरक्षक वैभव राऊत यांना स्फोटके बाळगल्याच्या कथित आरोपाखाली अटक झाली, तेव्हा त्यांच्या समर्थनासाठी सहस्रावधी धर्मप्रेमींनी रस्त्यावर उतरून या अटकेचा निषेध केला, त्या वेळी ‘गुन्हेगाराच्या समर्थनार्थ लोक कसे गोळा होतात ?’ असा प्रश्‍न पुरोगामी आणि प्रसिद्धी माध्यमांना पडला. हाच प्रश्‍न मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी फासावर लटकवलेल्या याकूब मेमन या आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांविषयी का पडला नाही ?

क्षणचित्रे

कु. गौरव राऊत आणि कु. जश राऊत
  • सभेच्या अखेरीस गोरक्षक श्री. वैभव राऊत यांचा सुपुत्र कु. जश राऊत (वय ९ वर्षे) आणि पुतण्या कु. गौरव राऊत (वय ९ वर्षे ) यांनी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हटले.
  • सभेच्या व्यासपिठापुढे ठेवण्यात आलेली सवत्स गोमातेची मूर्ती उपस्थितांचे आकर्षण ठरली होती.
  • हिंदू गोवंश रक्षा समितीच्या कार्याची माहिती देणारा छायाचित्रांचा ‘स्लाइड शो’ सभा चालू असतांना प्रोजेक्टरवर दाखवण्यात येत होता.
  • प्रदर्शनस्थळी योग वेदांत समिती आणि सनातन संस्था यांचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, औेषधी झाडांचे प्रदर्शन, विक्री केंद्र अन् क्रांतीकारकांच्या पराक्रमाविषयी माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

उपस्थित मान्यवर

शिवसेना – माजी नगरसेवक श्री. हर्षद राऊत, माजी जिल्हाप्रमुख श्री. शिरीष चव्हाण, विधानसभा संघटक श्री. जितेंद्र शिंदे, वसई तालुकाप्रमुख श्री. प्रवीण म्हाप्रळकर

भाजप – जिल्हा सरचिटणीस श्री. राजन नाईक, शहराचे जनरल सेक्रेटरी श्री. मनोज बारोट

संघटना – हिंदू युवा वाहिनीचे जिल्हाध्यक्ष श्री. वीकेश यादव, जिल्हा संयोजक श्री. प्रदीप मिश्रा

सहकार्यासाठी आभार !

शादी डॉट कॉम, नवकार मंडप आणि ओंकार डेकोरेटर, श्री. जयेंद्र(भाई) पाटील आणि कनात अल्प दरात देणारे श्री. रूपेश पवार

कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी आढावा बैठका

दिनांक : ५ फेब्रुवारी  वेळ : रात्री ८ वाजता

स्थळ : महाकाली मंदिर सभागृह, पहिला मजला, चावडी नाका, नालासोपारा (प.)

दिनांक : ६ फेब्रुवारी    वेळ : रात्री ८ वाजता

स्थळ : आचोळे गणपति मंदिर, पहिला मजला, रेल्वे स्थानकाजवळ, नालासोपारा (पू.)


Multi Language |Offline reading | PDF