हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यक्रमांत सहभागी न होण्याच्या अटीवर न्यायालयाकडून धनंजय देसाई यांची जामिनावर सुटका

मुंबई – पुण्याच्या मोहसीन शेख हत्येच्या प्रकरणी अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी ‘ते खटला संपेपर्यंत हिंदु राष्ट्र सेनेच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत’, अशी हमी उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. उच्च न्यायालयाने १७ जानेवारी या दिवशी देसाई यांचा जामीनअर्ज सशर्त संमत केला; परंतु खटला संपेपर्यंत देसाई यांनी हिंदु राष्ट्र सेनेचे कामकाज पहायचे नाही आणि त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांत सहभागी व्हायचे नाही, तसेच भाषणही द्यायचे नाही, अशा अटी घालण्यात आल्या होत्या.


Multi Language |Offline reading | PDF