तंत्रज्ञानाद्वारे भारत-बांगलादेश सीमा बंद करणार ! – राजनाथ सिंह

तंत्रज्ञानाद्वारे भारत-बांगलादेश सीमा बंद करण्यासमवेत सीमा ओलांडून भारतात येण्याचे कोणाचे धारिष्ट्य होणार नाही, असा धाक गेल्या साडेचार वर्षांत भाजप सरकारने बांगलादेशावर का निर्माण केला नाही ?

फालकत (बंगाल) – बांगलादेशाच्या सीमेजवळ कुंपण घालण्यासाठी केंद्राने बंगाल सरकारकडे भूमीची मागणी केली होती; मात्र अद्याप यासाठी सरकारकडून भूमी देण्यात आलेली नाही. (राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक भूमी न देणारे बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करा ! राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या गोष्टींना विलंब करणारे बंगाल भारतात आहे कि बांगलादेशमध्ये ?- संपादक) आता बंगाल आणि आसाम या राज्यांशी जोडल्या गेलेल्या बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यासाठी ‘एकात्मिक सीमा व्यवस्थापन’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ते अलीपूरदौर येथे एका सभेत बोलत होते.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, ‘‘उपलब्ध नोंदीनुसार सर्वाधिक हिंसाचार बंगालमध्ये झाला आहे. ‘त्यांच्या’ (ममता बॅनर्जी) राज्यात ‘माँ, माटी और मानुष’ (माता, भूमी आणि मनुष्य) यांच्यापैकी कोणीही सुरक्षित नाही. बंगालमध्ये १०० भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांपैकी कोणालाही सोडण्यात येणार नाही.’’ (एका राज्यात १०० पक्ष कार्यकर्त्यांची हत्या होऊनही निष्क्रीय रहाणारा भाजप हिंदू आणि अन्य जनता यांचे रक्षण काय करणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF