एका गावात होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून विरोध

राजकीय पक्षाने कितीही विरोध करून अडथळे आणले, तरी ईश्‍वराचा कृपाशीर्वाद असणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी होणारच, अशी हिंदुत्वनिष्ठांची श्रद्धा आहे !

‘एका गावात १० फेब्रुवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेथील सरपंचांनी गावात सभेचे निमंत्रण देण्यासाठी आणि विषय मांडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना नुकतेच निमंत्रित केले होते. समितीच्या कार्यकर्त्याने सभेचा विषय मांडण्यास प्रारंभ केल्यावर १० मिनिटांनंतर राजकीय पक्षाचा एक कार्यकर्ता अचानक विरोध करू लागला. ‘तुम्ही तरुणांची डोकी भडकवता, तुम्ही आग लावता, तुम्ही शिक्षणाविषयी काही बोलत नाही’, असे तो म्हणत होता. समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्ही वस्तूस्थिती मांडत आहोत. आम्ही सांगत असलेला विषय हा हिंदूंना जागृत करण्यासाठी आहे’, असे सांगूनही तो कार्यकर्ता ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. हा कार्यकर्ता ‘लव्ह जिहाद’ वगैरे काही नसते. युवकांनी प्रेम करायचे नाही का ?’ असे मोठ्याने सांगत होता. त्या वेळी समितीच्या कार्यकर्त्याने सांगितले, ‘‘आमच्याकडे ‘लव्ह जिहाद’चे पुरावे असून त्या संदर्भातील ग्रंथही आहे.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘हे सर्व तुम्ही मनानेच लिहिले असेल. गावातील मुसलमानही या देवळात येतात.’’ समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याला ‘बैठक झाल्यावर स्वतंत्र बोलू’, असे सांगूनही तो राजकीय कार्यकर्ता ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तेथे उपस्थित असणार्‍या एका हिंदूने त्याला ‘समितीचे कार्यकर्ते सभेचे निमंत्रण देण्यासाठी आले आहेत. ते काय सांगत आहेत, ते ऐकून घ्या. तुम्हाला पटत नसेल, तर विषय सोडून द्या’, असे सांगितले. यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित हिंदूंना निमंत्रण देऊन विषय थांबवला. समितीच्या कार्यकर्त्यांनी विषय थांबवल्यानंतर लगेचच तो राजकीय कार्यकर्ता तेथून निघून गेला.’


Multi Language |Offline reading | PDF