सनातनच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे ! – ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज, पंढरपूर

ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांचा पुष्पहार घालून सन्मान करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी), ३ फेब्रुवारी (वार्ता.)  सनातन संस्थेने भारतीय संस्कृतीवर आधारित प्रदर्शन लावल्यामुळेे आपल्या परंपरांचे महत्त्व लोकांना कळत आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या वेळी वारकरी संप्रदायाचे सोलापूर येथील ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, ह.भ.प. कैलास महाराज ढगे, धर्मजागरणचे ह.भ.प. शिवाजी महाराज नवल, यांसह इतर वारकरी बांधव उपस्थित होते. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, तसेच समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे पुढे म्हणाले की, या प्रदर्शनामुळे हिंदु संस्कृतीतील सर्व विषयांचा अभ्यास होत आहे. समाज आपल्या हिंदु संस्कृतीच्या परंपरा विसरत होता; मात्र या प्रदर्शनामुळे लोकांमध्ये जागृती होऊ लागली आहे.

गोहत्या थांबावी, तसेच धर्मांतरासंदर्भात हिंदूंनी सावध व्हावे, यासाठी सनातनने केलेला प्रयत्न कौतुकास्पद ! – ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण

ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण या वेळी म्हणाले की, आपल्या सण-उत्सवांमध्ये विकृती शिरल्या आहेत. देवतांची विटंबना होत आहे. ‘शुद्ध स्वरूपात देवतांची पूजा कशी करावी’, ‘उत्सव कसे साजरे करावेत’, हे या प्रदर्शनातून लक्षात येते. लोकांना गोमातेचे महत्त्व कळावे आणि गोहत्या थांबावी, यासाठी आपण जो प्रयत्न करत आहात, तो कौतुकास्पद आहे. देशासमोर धर्मांतराचा ज्वलंत प्रश्‍न आहे. ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान हे फसवून किंवा धाक दाखवून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करत आहेत. याविषयी प्रदर्शनातून जागृती केल्यामुळे हिंदू सावध झाले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF