‘राष्ट्रीय मुस्लिम मंचा’नंतर आता रा.स्व. संघ ‘राष्ट्रीय ईसाई मंच’ बनवण्याच्या सिद्धतेत

  • हिंदूंसाठी काही ठोस कार्य करण्याऐवजी अन्य पंथियांना चुचकारणारा संघ हिंदूहित काय साधणार ?
  • या मंचाची स्थापना झाली, तर त्यात सहभागी झालेले ख्रिस्ती हिंदूंचे आमीष दाखवून धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना विरोध करणार आहेत का ?

नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या वर्षभरापासून ख्रिस्ती संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक अपयशानंतर आता संघ ‘राष्ट्रीय ईसाई मंच’ स्थापन करण्याच्या सिद्धतेत आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यापूर्वी संघाने ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’ स्थापन केला आहे.

संघाने वर्ष २०१६ मध्ये काही पाद्य्रांशी या संदर्भात चर्चा केली होती; मात्र त्याला यश मिळाले नव्हते. नंतर वर्ष २०१७ मध्ये आगरा येथील एका ख्रिस्ती परिवाराशी चर्चा झाली होती. तेव्हापासून यासाठी प्रयत्न चालू आहेत. याविषयी संघाकडून कुणीही अधिकृतरित्या बोलण्यास सिद्ध नाही, असे म्हटले जात आहे. या चर्चेमध्ये सहभागी एका पदाधिकार्‍याने म्हटले आहे की, ख्रिस्ती संघासमवेत आले, तर त्यांना संघाची राष्ट्र उभारण्याची भूमिका समजू शकते. वर्ष २०१४ पासून यासाठी प्रयत्न चालू आहेत.


Multi Language |Offline reading | PDF