५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली केरळ येथील कु. मेघना सिजु (वय १५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मेघना सिजु एक आहे !

कु. मेघना सिजु

१. ‘मेघनाचे हस्ताक्षर चांगले आहे.

२. जिज्ञासा

तिच्या मनात येणारे साधनेविषयीचे प्रश्‍न ती लिहून ठेवते आणि साधकांना विचारते.

३. साधनेचे गांभीर्य

 अ. धर्मशिक्षणवर्गात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचा विषय घेतला. तेव्हा मेघनाने त्यात विशेष रुची दाखवली. नंतर तिच्या घरी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी साधक जात असत. काही कारणामुळे ती धर्मशिक्षणवर्गात येऊ शकत नसेल, तर तिला वाईट वाटत असे. प्रक्रिया जाणून घेतल्यानंतर ती नियमितपणे सारणी लिहू लागली. त्यानंतर तिच्यामध्ये पालट जाणवू लागला.

आ. ती स्वतःभोवतीचे आवरण काढणे, प्रार्थना आणि नामजप करणे, या कृती नियमितपणे करते, तसेच तिला प्रक्रिया कळल्यापासून परीक्षेचा कालावधी सोडून ती नियमितपणे सारणी लिहिते.

४. परीक्षेच्या कालावधीतही साधनेचे प्रयत्न करणे

अ. ती १० वीत आहे. परीक्षेच्या काळातही ती नामजप करते.

आ. ती परीक्षेच्या काळात आणि अभ्यासासाठी घेतलेल्या सुटीच्या दिवसांतही साधनेचे प्रयत्न करते. तिची आई म्हणते, ‘‘ती दिवसभर साधनेचे प्रयत्न अधिक करते.’’

इ. तिच्या परीक्षेच्या कालावधीत साधक घरी आल्यावर ती त्यांच्या समवेत साधनेविषयी बोलते.

५. आईला साधनेत साहाय्य करणे

आईला आध्यात्मिक त्रास होत असतांना मेघना तिला आध्यात्मिक उपाय करण्याची आठवण करून देते अन् उपाय करायला साहाय्य करते, तसेच त्रास उणावत नसेल, तर साधकांना भ्रमणभाष करून विचारण्यास सांगते.

६. प्रांजळपणा आणि स्वीकारण्याची वृत्ती

ती स्वतःच्या चुका प्रांजळपणे लिहिते. साधक तिच्या घरी प्रक्रिया समजावून सांगण्यास गेले. तेव्हा तिने घरातील सर्व सदस्यांसमोर मनातील विचार प्रांजळपणे मांडले. तिच्या आईने तिच्या चुका किंवा काही प्रसंग तिच्यासमोर सांगितले, तरीही तिला राग आला नाही. सर्व सहजपणे ऐकून घेऊन ती तिची विचारप्रक्रिया सांगत होती. त्यामुळे त्यांच्याकडे स्वभावदोषांविषयी चर्चा करतांना ताण वाटला नाही.

७. रामनाथी आश्रमात जाण्याची ओढ

अ. तिला हिंदी भाषा येत नाही. ‘रामनाथी आश्रमात जायचे असल्यास हिंदी भाषा कळली पाहिजे’, असे समजल्यावर ती हिंदी शिकण्याचा प्रयत्न करू लागली.

आ. ती घर किंवा आई-वडिलांना सोडून कुठेही राहिली नाही; पण ती रामनाथी आश्रमात किंवा केरळ सेवाकेंद्रात एकटी रहायला सिद्ध आहे. तिने आईला १० वीची परीक्षा झाल्यावर तिला केरळ सेवाकेंद्रात सोडायला सांगितले आहे.

८. भाव

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे ती पुष्कळ वेळ बघत बसते. तिची आई सांगते, ‘‘ती सलग २ घंटेही तो ग्रंथ पुनःपुन्हा बघत बसते.’’

९. कु. मेघनामध्ये जाणवलेले पालट

अ. ती आधी अल्प बोलायची, तसेच ती इतरांमध्ये मिसळत नसे आणि घाबरून असायची. आता तिचा आत्मविश्‍वास वाढला आहे. ती सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न करते.

आ. तिचा तोंडवळा अधिक तेजस्वी आणि आनंदी वाटतो.

१०. स्वभावदोष

सर्व कृती सावकाश करणे, मनोराज्यात रमणे, राग येणे आणि भावनाप्रधानता.

तिचे राग येणे, स्वतःचे आवरणे आणि केस विंचरणे या कृतींना वेळ लागणे इत्यादी स्वभावदोष न्यून झाले आहेत.’

– कु. रश्मी परमेश्‍वरन् आणि कु. अदिती सुखठणकर, केरळ (एप्रिल २०१८)


Multi Language |Offline reading | PDF