५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला केरळ येथील कु. भूषण पाटील (वय ७ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. भूषण पाटील एक आहे !

कु. भूषण पाटील

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

केरळ येथील सौ. पद्मा पाटील आणि त्यांचे यजमान हे अन्य साधनामार्गानुसार साधना करतात. त्यांचा मुलगा कु. भूषण हा सनातनची सात्त्विक उत्पादने विकत घेतो. तो कधी-कधी केरळमधील सनातनच्या सेवाकेंद्रात येतो. त्याची केरळ येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्येे येथेे दिली आहेत.

१. जन्मापूर्वी

‘सौ. पाटील यांना मूल होत नव्हते. काही विशिष्ट विधी आणि साधना केल्यावर भूषणचा जन्म झाला.

२. गुणवैशिष्ट्ये

२ अ. शांत आणि समजूतदार

१. भूषण फार शांत आणि समजूतदार वाटतो. त्यामुळे त्याच्याकडे सगळे आकर्षिले जातात. तो त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे दंगा करत नाही किंवा मोठ्याने बोलत नाही.

२. त्याची आश्रमात कुणाशी फार ओळख नाही, तरीही तो सर्वांशी बोलतो. एकदा त्याचे आई-वडील त्याला थोड्या वेळासाठी साधकांसमवेत सेवाकेंद्रात ठेवून बाहेर गेले होते. त्या वेळी तो सेवाकेंद्रात साधकांसह आनंदाने राहिला.

२ आ. नामजप करणे

१. त्याची हनुमंतावर पुष्कळ भक्ती आहे. एकदा तो आश्रमात आला असतांना त्याच्या वयाचे कुणी नसल्याने त्याला कंटाळा आला. तेव्हा साधकांनी त्याला सांगितले, ‘‘तुला जो देव आवडतो, त्याचा नामजप कर आणि धाव.’’ सांगितल्याप्रमाणे हनुमंताचा नामजप करत तो धावला आणि त्याचा उत्साह वाढला.

२. एकदा भूषण सेवाकेंद्रात आला असतांना त्याला बसून नामजप करायला सांगितला. तेव्हा तो १५ मिनिटे डोळे मिटून बसला. नंतर साधकांनी त्याला विचारले, ‘‘तू कुठला नामजप करत होतास ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला नामजप करायचे ठाऊक नाही. मी देवाचे नाव घेत होतो.’’

– केरळ येथील सर्व साधक

२ इ. ‘भूषण सात्त्विक वाटतो. ‘तो उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला  आलेला आहे’, असे मला वाटते.

३. स्वभावदोष

तो पटकन सर्वांमध्ये मिसळत नाही. तो लाजरा आहे.’

– कु. अदिती सुखठणकर, केरळ (१.४.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now