हिंदु राष्ट्र-जागृती सभांना दडपण्याचा प्रयत्न निंदनीय ! – गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे विरोधानंतरही पार पडलेली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. गंगाधर कुलकर्णी, सौ. कावेरी रायकर, सौ. विदुला हळदीपूर, श्री. मोहन गौडा

शिवमोग्गा (कर्नाटक) – शिवमोग्गा आणि मंगळूरू येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभांना कर्नाटक सरकार आणि पोलीस यांच्याकडून देण्यात आलेला त्रास पाहिल्यास आपण भारतात आहोत कि पाकिस्तानात ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो. सरकारच्या अशा हिंदुविरोधी धोरणाचा हिंदूंनी कडाडून विरोध केला पाहिजे. पोलिसांनी अशा कार्यक्रमांना दाबण्यात वेळ घालवण्यापेक्षा मदरशांमध्ये चालणार्‍या गोष्टींकडे लक्ष दिले असते, तर त्यांच्या कर्तव्याला न्याय मिळाल्यासारखे झाले असते. हिंदूंनी आतापर्यंत १ सहस्र वर्षांपासून अनुभवत असलेले त्रास थांबवण्यासाठी प्रयत्न करणे आणि हिंदु समाजाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे श्री. गंगाधर कुलकर्णी यांनी येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये केले. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, रणरागिणी शाखेच्या सौ. विदुला हळदीपूर आणि सनातन संस्थेच्या सौ. कावेरी रायकर यांनीही मार्गदर्शन केले. ‘संपूर्ण समाजाला जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती मोठे कार्य करत आहे’, असे गौरवोद्गारही श्री. कुलकर्णी यांनी काढले.

क्षणचित्रे

१. सभा संपायला वेळ लागला, तरी कार्यक्रम संपेपर्यंत ७५ टक्के धर्माभिमानी उत्साहाने सहभागी झाले होते.

२. गटचर्चेसाठीच्या कार्यक्रमात ६७ जण सहभागी झाले हाते.

पोलिसांनी दिलेली अनुमती जाणीवपूर्वक नाकारली

जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस सरकार यांची ही असहिष्णुता पुरो(अधो)गाम्यांना कधीही दिसत नाही, हे लक्षात घ्या !

ही सभा प्रथम मैदानात घेण्याचे ठरले होते. सभेच्या आदल्या दिवशी पोलिसांनी मैदानासाठी दिलेली अनुमती नाकारल्याने दुसर्‍या सभागृहात नियोजन करण्यात आले. या सभेच्या वेळीच जिल्हा प्रशासनाकडून ‘सह्याद्री उत्सवा’चे नियोजन करण्यात आले होते. तरीही या सभेला हिंदुत्वनिष्ठांनी सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला.


Multi Language |Offline reading | PDF