मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारकडून सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील पुजार्‍यांच्या मानधनात तिप्पट वाढ

काँग्रेसला खरेच हिंदूंसाठी काही करायचे आहे, असे वाटत असेल, तर तिने धार येथील भोजशाळा हिंदूंसाठी खुली करून तेथे सरस्वतीदेवीची पूजा करण्याची अनुमती देण्याचा निर्णय घेऊन दाखवावा !

भोपाळ – मध्यप्रदेशात सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील पुजार्‍यांच्या मानधनात काँग्रेस सरकारने तिप्पट वाढ करण्याची घोषणा केली आहे. याचा लाभ २५ सहस्र पुजार्‍यांना होणार आहे. याविषयीची माहिती जनसंपर्क आणि धार्मिक न्यास विभागाचे मंत्री पी.सी. शर्मा यांनी दिली. तसेच ग्वाल्हेर रियासतीच्या नियंत्रणात असणार्‍या मशिदींतील मौलवींच्या मानधनातही तिप्पट वाढ करण्यात आली आहे. १ जानेवारी २०१९ पासून या निर्णयाची कार्यवाही चालू झाली आहे. (‘हिंदूंना दिले की, मुसलमानांनाही दिले पाहिजे’, असेच काँग्रेसवाल्यांना वाटते; मात्र ‘मुसलमानांना दिल्यावर हिंदूंना दिले पाहिजे’, असे त्यांना कधी वाटत नाही ! – संपादक)

१. ज्या मंदिरांकडे भूमी नाही, अशा मंदिरांतील पुजार्‍यांना ३ सहस्र, ५ एकरपर्यंत भूमी असणार्‍या मंदिरांतील पुजार्‍यांना २ सहस्र १००, तर १० एकर भूमी असणार्‍या मंदिरांच्या पुजार्‍यांना १ सहस्र ५६० रुपये मिळणार आहेत.

२. ओरछा येथील श्री रामराजा तीर्थस्थळामध्ये एक तीर्थयात्री सेवासदन बनवण्यात येणार आहे. यासाठी ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

३. सरकार ३ सहस्र ६०० यात्रेकरूंना कुंभसाठी पाठवणार आहे. या यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयागराज येथे माहिती केंद्रही उघडण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF