शहरी नक्षलवादी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक आणि न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका

नक्षलवाद्यांना अटक होण्यासाठी कोरेगाव भीमा दंगल व्हावी लागली. त्यानंतरही हिंदुविरोधकांच्या प्रभावाखाली येऊन प्रशासनाने हिंदुत्वनिष्ठांना अटक केली होती. शहरी नक्षलवाद्यांवर यापूर्वीच कारवाई न होणे, हे सरकारचे अपयश आहे ! नक्षलवादाचा मुळासकट कायमचा बीमोड होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पुणे / मुंबई – नक्षलवाद्यांशी संबंधित डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच रात्री म्हणजे २ फेब्रुवारीला पहाटे मुंबई विमानतळावरून त्यांना अटक केली; मात्र ही अटक नियमबाह्य असल्याचे सांगत पुणे विशेष न्यायालयाने आनंद तेलतुंबडे यांची तातडीने मुक्तता करण्याचा पोलिसांना आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटकेपासून संरक्षण देतांना ४ आठवड्यांची मुदत दिली होती. त्या कालावधीत ते जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे जामिनासाठी आवेदन करू शकत होते; मात्र जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वरच्या न्यायालयात जाण्याच्या आधीच त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे ती अवैध आहे, असे मत पुणे येथील विशेष जिल्हा न्यायाधीश के.डी. वडणे यांनी नोंदवले.

न्यायालयाच्या निर्णयानंतर पुणे पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई म्हणजे ‘नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे’, असे मत व्यक्त करत नक्षलसमर्थकांकडून नक्षलवाद्यांप्रती सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘प्रत्यक्षात डॉ. तेलतुंबडे यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास नकार दिला होता. डॉ. तेलतुंबडे यांनी त्यांच्या लिखाणामध्ये माओवाद्यांकडून होणार्‍या हिंसेचे समर्थन केले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांची कारवाई अन्यायकारक नसून विशेष न्यायालयाने डॉ. तेलतुंबडे यांचा जामीन फेटाळण्याच्या निर्णयाच्या काढलेल्या अर्थाविषयी (निकालाचे ‘इंटरप्रिटेशन’) चर्चा होऊ शकते’, असे तज्ञांचे मत आहे.

डॉ. तेलतुंबडे यांच्यावर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संबंध, तसेच नक्षलवाद्यांशी संबंध असणे, असे आरोप आहेत. नक्षलसमर्थक शोमा सेन यांच्या भ्रमणसंगणकामध्ये जी संगणकीय पत्रे मिळाली आहेत, त्यानुसार ‘डॉ. तेलतुंबडे यांनी पॅरिसला जाऊन ‘कोरेगाव भीमा विषय ज्वलंत ठेवावा’, असे सूचित केले होते, तर ‘डॉ. तेलतुंबडे हे अमेरिकन विद्यापिठाच्या निमंत्रणावरून वर्ष २०१७ मध्ये पॅरिसला गेले होते. त्याचा व्यय त्या विद्यापिठाने केला होता. न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये  डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. जर कॉम्रेड प्रकाश म्हणजे प्रकाश आंबेडकर होऊ शकत नाही, तर कॉम्रेडचा अर्थ आनंद तेलतुंबडे कसा होईल’, असा दावा बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.


Multi Language |Offline reading | PDF