शास्त्राच्या मार्गाने जाणार्‍यांचे हितच होते ! – शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखरभारती स्वामी, शृंगेरी पीठ

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. प्राजक्ता जोशी यांचाही सहभाग

सौ. प्राजक्ता जोशी यांचा सत्कार करतांना श्री. व.दा.भट

नगर – सर्व व्यक्तींचे जीवन शास्त्राशी जोडलेले आहे, हे लक्षात घेऊन शास्त्रानुसार जीवन व्यतीत करणार्‍यांचेच जीवन सार्थकी होते. व्यक्तीने वेळ न पहाता आपल्या इच्छेनुसार कर्माआधारे अनुष्ठान केले, तर ते सफल होत नसल्याचे अनुभवास येते. हित आणि अहित यांचा उपदेश जे करते, त्यास ‘शास्त्र’ असे म्हणतात. शास्त्राच्या मार्गाने जे जातात, त्यांचे हितच होते. धर्माचरण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन शृंगेरी पिठाचे शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखरभारती स्वामी यांनी केले. शृंगेरी येथील दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् आणि नगरमधील श्री दत्त देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ जानेवारी या कालावधीत श्रीदत्तक्षेत्रमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ज्योतिष अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र आणि गोवा येथून अनेक ज्योतिषी या अधिवेशनात उपस्थित होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सौ. प्राजक्ता जोशी याही अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अधिवेशनातील एका भागाचे सूत्रसंचालन केले. शाल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, तसेच प.पू. क्षीरसागर महाराज यांच्या तपोभूमीतील श्रीदत्त देवस्थानकडून अधिवेशनात सहभागी सर्वांना श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF