(म्हणे) ‘धर्मनिरपेक्षता हीच खरी आपली ओळख आहे’ ! – जावेद अख्तर, गीतकार

इस्लाममध्ये धर्मनिरपेक्षता ही संकल्पना नावाला तरी आहे का ? इस्लाममधील ‘सर्वत्रच्या काफिरांना (इस्लामेतरांना) नष्ट करून ‘दार-उल-इस्लाम’ (इस्लामचे राज्य) करण्या’ची संकल्पना काय आहे, हेसुद्धा अख्तर यांनी सांगावे ! समानतेचे धडे हिंदूंना देण्याआधी अख्तर यांनी ते स्वतःच्या धर्मबांधवांना द्यावेत ! हिंदु धर्मात मात्र ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची संकल्पना आहे आणि ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु’ ही संकल्पनाही आहे; त्यामुळे हिंदु धर्म मुळात सर्वसमावेशक आहे !

मुंबई – धर्मनिरपेक्षता ही हिंदुस्थानची विचारधारा आहे. ५० वर्षे औरंगजेबाने राज्य केले; पण त्यालाही हिंदुस्थानची विचारधारा संपवता आली नाही. (औरंगजेबच काय दीड सहस्र वर्षे इस्लामी आक्रमकांनी भयंकर रक्तपात करून हिंदूंची मंदिरे आणि स्त्रिया यांच्यावर आक्रमणे केली. तलवारीच्या जोरावर टिपू सुलतान, अकबर, चेंगीजखान आदींनी येथील हिंदुत्वाच्या विचारधारेसह हिंदूंना नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले, तरी त्यांना यांपैकी काहीच संपवता आले नाही. – संपादक) मग ५ वर्षे झालेल्या मोदी सरकारला काय ती संपवता येणार. (मोदी सरकार आणि क्रूर धर्मांध इस्लामी राज्यकर्ते यांची तुलना करणारे अख्तर ! हिंदुत्व हीच भारताची खरी ओळख असल्याने जनतेने खोटी धर्मनिरपेक्षता जोपासणार्‍या काँग्रेसचे सत्तांतर केले. – संपादक) याच सूत्रावर लक्ष ठेवून आता जनताच सत्तांतर करेल, असे वक्तव्य गीतकार जावेद अख्तर यांनी केले. (जावेद अख्तरही आता कोणत्या पक्षासाठी बोलत आहेत ? – संपादक) सोफिया महाविद्यालयात महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त ‘अहिंसा आणि सौहार्द’ या विषयावर ३० जानेवारी या दिवशी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

या वेळी जावेद अख्तर पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात योगदान नसणार्‍यांनी गांधींना मारले. (स्वामी श्रद्धानंद यांना कोणी मारले? स्वातंत्र्यलढ्यात मुसलमानांचे योगदान किती होते आणि स्वतः गांधी यांचे किती होते, हेही अख्तर यांनी अभ्यासावे. क्रांतीकारकांच्या बलीदानाने भारत स्वतंत्र झाला आहे ! – संपादक) सर्वांना समान न्याय द्या आणि केवळ अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण नको. (अख्तर यांनी हे त्यांच्या आजूबाजूला असलेल्या साम्यवादी आणि समाजवादी कंपूला सांगावे ! – संपादक)

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चेलमेश्‍वर या वेळी म्हणाले की, न्यायव्यवस्थेवर सगळीकडून दबाव आणला जात आहे. विलंबित न्यायाच्या दुरुस्तीसाठी काय उपाययोजना केल्या ? यासाठी जनतेचा दबाव धोरणकर्त्यांवर असला पाहिजे.

इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल या वेळी म्हणाल्या की, हिंदुत्वाच्या नावाखाली धर्मामध्ये द्वेष, हिंसा पसरवली जात आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे हनन होत आहे. विज्ञान आणि कला यांमध्ये खुळचट गोष्टींचा शिरकाव होत आहे. (यांपैकी काहीच हिंदु करीत नाहीत. असे केले असते, तर सहगलबाई हे बोलू तरी शकल्या असत्या का ? – संपादक) आम्ही साहित्यिकांनी पुरस्कारवापसी करून विरोध केला. ही चळवळ अधिक विस्तारायला हवी. (असले विद्वेषी साहित्यिक हवेत कोणाला ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF