मुसलमानांनी स्वतःच्या प्रयत्नांद्वारे मदरशांवर लागलेला डाग धुतला पाहिजे ! – जमीयत उलेमा-ए-हिंद

मदरसे ‘आतंकवादाचा अड्डा’ असल्याचा आरोप झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केले भाष्य !

  • डाग धुण्यापेक्षा वस्तूस्थिती स्वीकारून मदरशांतील मौलाना आणि विद्यार्थी आतंकवादाकडे वळणार नाहीत, तेथे लैंगिक अत्याचार होणार नाहीत, यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
  • मदरशांतून देण्यात येणारी शिकवण आतंकवादाकडे नेत नाही ना, हे पाहून त्यात पालट केला पाहिजे !

लक्ष्मणपुरी – स्वातंत्र्यलढ्यापासून ते आतापर्यंत भारताच्या उभारणीत मदरशांचे योगदान राहिले आहे. त्यांना ‘आतंकवादाचा अड्डा’ म्हणणे हे त्यांचा अवमान केल्यासारखे आहे. मुसलमानांनी त्यांच्या प्रयत्नांद्वारे मदरशांंवर लागलेला हा डाग धुतला पाहिजे, असे आवाहन जमीयत उलेमा-ए-हिंदचे मौलाना अर्शद मदनी यांनी केले. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशचे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मदरशांना ‘आतंकवादाचे अड्डे’ म्हटले होते. त्यावर मदनी यांनी वरील आवाहन केले.

मदनी पुढे म्हणाले की, मदरशांवर विविध प्रकारचे आरोप करून त्यांच्यावर आघात केले जात आहेत, हे अत्यंत निंदनीय आणि चिंता करायला लावणारे आहे. मदरशांच्या व्यवस्थापकांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना मदरशांमध्ये आमंत्रित करून त्यांना त्यांच्या कार्यप्रणालीची माहिती दिली पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF