खेर्डी (चिपळूण) बाजारपेठेतील शिवमंदिर अज्ञातांकडून उद्ध्वस्त

  • हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या भाजपच्या राज्यात हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त होणे, हे लज्जास्पद !
  • हिंदूंनो, तुम्हाला चैतन्य पुरवणार्‍या मंदिरांना उद्ध्वस्त करणार्‍यांवर ठोस कारवाई होईपर्यंत सरकारकडे पाठपुरावा करा !

चिपळूण, १ फेबु्रवारी (वार्ता.) – तालुक्यातील खेर्डी बाजारपेठेतून कराडकडे जाणार्‍या महामार्गाच्या लगत असलेले छोटे शिवमंदिर उद्ध्वस्त केल्याचे १ फेबु्रवारीला पहाटे आढळून आले. हे शिवमंदिर अनेक वर्षांपासून तेथे होते. ‘या कृत्यामागे कोणाचा हात असू शकतो ?’, हे स्थानिक नागरिकांना नेमकेपणाने सांगता येत नव्हते. ही वार्ता समजताच चिपळूण पोलीस निरीक्षक पोळ आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. खेर्डी येथील लोकप्रतिनिधीही घटनास्थळी उपस्थित होते. ‘सध्या या मार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून त्यामध्ये हे मंदिर येत होते’, असे तेथील काही नागरिकांचेे म्हणणे आहे. ‘रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हे मंदिर पाडले नसावे ना ?’, असा संशय काही जणांनी व्यक्त केला.


Multi Language |Offline reading | PDF