राष्ट्रप्रेमींना एकत्र करण्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा ठरली ।

‘३.२.२०१९ या दिवशी पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आहे. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन सभेचा प्रसार करत आहेत. या निमित्ताने सुचलेली कविता पुढे देत आहे. 

कु. उज्ज्वला ढवळे

राष्ट्रप्रेमींना एकत्र करण्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ठरली ।
गुरुमाऊली म्हणे, ‘मावळ्यांनो ।
तुम्हाला जागृत करण्या सभा ठरली’ ॥ १ ॥

मावळ्यांच्या ठरल्या संघटन बैठका ।
गुरुमाऊली साधकांना म्हणे ।
तुम्ही केल्या ना चालू तुमच्या इंद्रियांच्या बैठका ॥ २ ॥

धर्मप्रसार उत्तम होण्या धर्मवीर अनेकांना भेटती ।
गुरुमाऊली म्हणे, बाळांनो ।
गुण वाढवण्या आता अंगीकारा तुम्ही शरणागती ॥ ३ ॥

कृष्णसभा आयोजने मावळे वाढविती इच्छाशक्ती ।
गुरुमाऊली म्हणे, बाळांनो ।
स्वभावदोष-अहंभाव जाण्या वाढवा आता अंतःशक्ती ॥ ४ ॥

मावळे जाती गावोगावी, घरोघरी करण्या वैचारिक क्रांती ।
गुरुमाऊली म्हणे, बाळांनो ।
समवेत आता चालू राहू दे आत्मोत्थानाची क्रांती ॥ ५ ॥

वदता गुरुमाऊली, झाले अंतर्मुख सर्व मावळे ।
सर्व जण पहाता गुरुमाऊलीकडे ।
मुखकमलावर दिसले वात्सल्यमय हास्य निराळे ॥ ६ ॥

प्रेमभरे गुरुमाऊली म्हणे ।
माझी लेकरे सर्वांहून खूपच वेगळी ।
कृष्णा ने रे आता सर्वांना सत्वर मोक्षस्थळी ॥ ७ ॥’

– कु. उज्ज्वला ढवळे, चिंचवड, जिल्हा पुणे. (२८.१.१०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now