हिंदु राष्ट्र-जागृतीसाठी समर्पित होऊया सर्वांनी ।

‘३.२.२०१९ या दिवशी पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आहे. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन सभेचा प्रसार करत आहेत. या निमित्ताने सुचलेली कविता पुढे देत आहे. 

कु. वैभवी भोवर

सभा आली आता समीप ।
सर्व मावळ्यांनी व्हावे आता सज्ज ॥ १ ॥

गुरुमाऊलीचा करूनी धावा ।
धरावा ध्यास धर्मप्रसाराचा ॥ २ ॥

देवाला आळवता प्रसार हा सर्वदूर व्हावा ।
भगवान श्रीकृष्णाचा सहवास सर्वांनी अनुभवावा ॥ ३ ॥

अर्जुनाप्रमाणे दास व्हावे भगवंताचे ।
श्रीरामाच्या मारुतिरायाप्रमाणे भक्त व्हावे गुरुदेवांचे ॥ ४ ॥

सभा आहे ही शिवरायांच्या सर्व मावळ्यांची ।
हिंदु राष्ट्र-जागृतीसाठी समर्पित होऊया सर्वांनी ॥ ५ ॥

देवा, तूच धावून ये आता सत्वरी ।
आम्हाला पदोपदी अनुभवता येऊ दे रे तुझी उपस्थिती ॥ ६ ॥’

– कु. वैभवी भोवर, पुणे (२८.१.१०१९)


Multi Language |Offline reading | PDF