कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनाने काढलेल्या पंचांगामध्ये कुंभमेळ्याच्याच माहितीचा अभाव !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

  • पंचांगात इंग्रजी भाषेतील आकडे !

  • कुंभमेळा आणि भारतीय संस्कृती यांची माहिती नाही !

प्रयागराज (कुंभनगरी) – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘कुंभमेळा २०१९’ असे पंचांग प्रकाशित केले आहे; मात्र या पंचांगात कुंभमेळ्याची शास्त्रीय, तसेच भारतीय संस्कृतीची माहिती दिलेली नाही. या पंचांगात दिनांक इंग्रजी भाषेतून देण्यात आले आहेत. कुंभमेळ्यात ठिकठिकाणी पत्रकार, शासकीय कार्यालय, शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि भाविक यांना विनामूल्य हे पंचांग वाटप करण्यात आले. पंचांग पाहिले असता यावर लक्षावधी रुपये खर्च केल्याचे लक्षात येते.

‘कुंभमेळा २०१९’ हे पंचांग मोठ्या आकाराचे असून त्यामध्ये ‘देवता आणि दानव यांचे अमृत मंथन, त्रिवेणी संगम तट, त्यावरील भाविक स्नान करत असल्याचे दृश्य, त्रिवणी आरती, राजयोगी स्नानाचे दृश्य, आखाड्यांची शोभा यात्रा, पावन त्रिवेणी संगम, पानटून पूल, दारागंज येथील बेनी माधव मंदिर, प्रयागराज स्थितीत टेन्ट (तंबू) स्थिती, संगम तटावरील बडे हनुमान मंदिर, कल्याणी देवी, रात्रीचे त्रिवेणी संगमचे विहंगम दृश्य’ असे मोठ्या छायाचित्रांद्वारे दाखवण्यात आले आहे; मात्र या पंचांगात कुंभमेळ्याच्या इतिहासाची माहिती देण्याचा शासनाला विसर पडला आहे.


Multi Language |Offline reading | PDF