बेंगळूरू – त्यांना धर्माची कोणतीही माहिती नाही. ते किती खोटे बोलतात ते पहा. एक मुसलमान वडील आणि ख्रिस्ती आई यांचा मुलगा ब्राह्मण कसा असू शकतो?, असा प्रश्न केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता विचारला. तुम्ही जगभरातील कोणत्याही प्रयोगशाळेत असा मिश्रित वंश बनवू शकणार नाही; मात्र भारतात काँग्रेसच्या प्रयोगशाळेत ते होऊ शकते, असेही हेगडे म्हणाले. राजस्थानच्या पुष्कर येथे पूजा करतांना तेथील पुजार्याने राहुल गांधी यांना ‘त्यांचे गोत्र दत्तात्रेय असून ते काश्मिरी ब्राह्मण आहेत’, असे म्हटले होते.