विमा आस्थापनांची १ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक; दोन धर्मांध आधुनिक वैद्यांसह टोळी अटकेत

ठाणे – महापालिकेच्या मुंब्रा येथील आरोग्य विभागातील अधिकार्‍यांना हाताशी धरून आरोपींनी १० जिवंत व्यक्तींच्या मृत्यूची बनावट प्रमाणपत्रे आणि मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींचे बनावट मृत्यू अहवाल सिद्ध करून त्याआधारे दोन विमा आस्थापनांची १ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. (स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणारे धर्मांध ! – संपादक) या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने आधुनिक वैद्य अब्दुल मोईद सिद्धिकी आणि इम्रान सिद्धिकी, तसेच मुंब्रा स्मशानभूमीतील कर्मचारी तेजपाल मेहरोल आणि यामागील सूत्रधार असलेला कल्याण पूर्वेतील चंद्रकांत नरसिमलू शिंदे यांना अटक केली आहे. या आरोपींना उल्हासनगर न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF