बेंगळूरू येथे ‘मिराज २०००’ लढाऊ विमान कोसळून २ वैमानिकांचा मृत्यू

उडत्या शवपेट्या झालेली भारतीय वायूदलाची विमाने !

बेंगळूरू – येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर १ फेब्रुवारीला सकाळी ‘मिराज २०००’ हे लढाऊ विमान कोसळून त्यामधील २ प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला. त्यांचे नाव नेगी आणि अबरोल आहे. वायूदलाने या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. (आतापर्यंत असंख्य विमाने कोसळून वैमानिकांचा मृत्यू झाला आणि प्रत्येक वेळी चौकशीचा आदेश देण्यात आला होता, तरीही असे अपघात होतच आहेत, तर ‘चौकशा करून केवळ औपचारिकताच पूर्ण करण्यात येते का ?’, हे वायूदलाने सांगितले पाहिजे ! – संपादक) विमानाला आग लागल्यानंतर दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली होती; मात्र एक वैमानिक  विमानाच्या अवशेषांवर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसर्‍या वैमानिकाचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now