जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या शिबिराच्या वेळी कॅनडा येथील सौ. राधा मल्लिक यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

सौ. राधा मल्लिक

१. शिबिरात सहभागी होण्याविषयी साधिकेच्या मनात नकारात्मक विचार येणे आणि शिबीर चालू असलेल्या सभागृहात मनाविरुद्ध गेल्यावर तिला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला तीव्र त्रास होणे : ‘७.१.२०१५ या दिवशी सकाळपासून मला पुष्कळ त्रास होत होता, तसेच माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. ‘मला शिबिरात सहभागी व्हायचे नसून मला घरी पाठवावेे’, असे मला वाटत होते. शिबिरात सहभागी होण्यासाठी मी सभागृहात जाण्यास सिद्ध नव्हते. त्यामुळे माझ्या मनाविरुद्ध मी शिबीर चालू असलेल्या सभागृहात आले. तेथे पोहोचल्यानंतर मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला तीव्र त्रास झाला.

२. वाईट शक्तीला शिबिरातील चैतन्य सहन न झाल्याने तिने ‘साधिका शिबिराच्या सभागृहातून निघून आश्रमापासून लांब पळून जात आहे’, असे दृश्य दाखवणे : दुपारी एका सत्राच्या शेवटी मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला शिबिरातील चैतन्य सहन होईनासे झाले. त्यामुळे ती ‘मी शिबिराच्या सभागृहातून निघून आश्रमापासून लांब पळून जात आहे’, असे दृश्य मला दाखवू लागली आणि माझ्या मनात तसे विचार घालू लागली.

३. साधक प्रार्थना करत असतांना पावलांचा आवाज न करता सभागृहातून बाहेर पडून रस्त्याजवळ पोहोचणे, तेथे साधकांच्या साहाय्याने पुन्हा आश्रमात येणे आणि देवाच्या कृपेने या कालावधीत रस्त्यावर एकही वाहन न येणे : त्या वेळी शिबिरातील साधक एकाग्रतेने प्रार्थना करत होते. तेव्हा ‘पळून जाण्यासाठी हीच योग्य संधी आहे’, असा विचार वाईट शक्तीने माझ्या मनात घातला. मी उठून पावलांचा आवाज न करता मागील दाराने सभागृहातून बाहेर पडले. त्यानंतर मी हळुवार पावले टाकत आश्रमाच्या बाहेर पडले. मी रस्त्याजवळ पोहोचले असतांना थोड्या वेळाने मला स्वतःचे अस्तित्व जाणवू लागले. तेव्हा मला अन्य साधकांच्या साहाय्याने आश्रमात आणले. हे सर्व घडत असतांना देवाच्या कृपेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी एकही गाडी आली नाही.

४. संध्याकाळपर्यंत स्वतःचे अस्तित्व अधिक प्रमाणात जाणवणे आणि ‘शिबिरातून पुष्कळ चैतन्य मिळून वाईट शक्तीची शक्तीही न्यून झाली’, असे जाणवणे : संध्याकाळपर्यंत मला बरे वाटून माझे अस्तित्व अधिक प्रमाणात जाणवले. ‘शिबिरातून मला पुष्कळ चैतन्य मिळाले, तसेच मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीची शक्तीसुद्धा न्यून झाली’, असे मला जाणवले.’

सौ. राधा मल्लिक, व्हॅन्कुअर, कॅनडा. (७.१.२०१५)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF