एन् डी एफ् बी संघटनेचा प्रमुख रंजन दाईमरी याच्यासह ९ जणांना जन्मठेपेची शिक्षा

वर्ष २००८ मधील आसाममधील बॉम्बस्फोटांचे प्रकरण

बॉम्बस्फोटांच्या प्रकरणाचा निकाल १० वर्षांनी लागणे हा न्याय म्हणता येईल का ?

गुवाहाटी (आसाम) –  नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रण्ट ऑफ बोडोलॅण्डचा (एन् डी एफ् बी चा) प्रमुख रंजन दाईमरी याच्यासह ९ जणांना सीबीआयच्या जलदगती न्यायालयाने ३० ऑक्टोबर २००८ मध्ये झालेल्या आसामधील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच अन्य ५ जणांनाही शिक्षा करण्यात आली आहे. या प्रकरणातील ७ आरोपी अद्याप फरार आहेत. गुवाहाटी, कोकराजहर, बोंगईगाव आणि बारपेटा येथे हे बॉम्बस्फोट झाले होते. यात ८८ जण ठार झाले होते, तर ४०० हून अधिक जण घायाळ  झाले होते. वर्ष २०१७ पासून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येत होते. (प्रत्येक न्यायालय हे जलदगती न्यायालय का होऊ शकत नाही ?, असा प्रश्‍न जनतेला पडल्यास आश्‍चर्य वाटू नये ! तसेच ९ वर्षांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयाकडे का देण्यात आले ? त्या्पू्र्वी् का देण्यात आले नव्हते ?, असे प्रश्‍न उपस्थित होतात ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now