‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाहिल्यावर बोयान बाल्याक यांना झालेले त्रास

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले

ग्रंथ पाहिल्यावर साधकाचा त्रास वाढणे, ‘मिळेल त्या वस्तू ग्रंथाच्या दिशेने फेकाव्यात’, असे त्याला वाटणे, त्याला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला पुष्कळ राग येणे आणि ती हताशही झालेली असणे : ‘मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे खोकला आणि ढेकरा येत असल्या, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने तो नियंत्रणात होता. ६.१.२०१८ या दिवशी सद्गुरु सिरियाक वाले यांनी जेव्हा मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दाखवला, तेव्हा माझा त्रास वाढला. मी भूमीवर बसलो. ‘हातात मिळेल, त्या वस्तू ग्रंथाच्या दिशेने फेकून द्याव्यात’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला पुष्कळ राग आला होता अन् ती हताशही झाली होती.’

– श्री. बोयान बाल्याक, युरोप (६.१.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF