गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांकडून पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संस्थेला अभिनंदनाचे पत्र

  • हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांना पोटदुखी !
  • पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी चांगले कार्य केले आहे, तर त्याचे सरकार कौतुक करत असेल, तर प्रसारमाध्यमांना पोटदुखी का? मदर तेरेसा यांनी समाजसेवेच्या नावाखाली हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले, त्याविषयी प्रसारमाध्यमे तोंड का उघडत नाहीत ?

कर्णावती – गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संस्थेचे १४ फेब्रुवारी हा ‘मातृ-पितृ दिवस’ साजरा करत असल्यावरून अभिनंदन केले आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या आश्रमाला त्यांनी राज्यशासनाच्या वतीने अभिनंदनाचे पत्र लिहिले आहे. हे पत्र लिहिल्यावरून प्रसारमाध्यमांकडून जाणीवपूर्वक चुडासमा यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका करणारी वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली आहेत. (पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणार्‍या प्रसारमाध्यमांना भारतीय संस्कृतीशी काहीही देणेघेणे नाही, हे लक्षात घ्या ! अशा हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF