ख्रिस्तीबहुल अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड करून मूर्तींचे विद्रूपीकरण

मंदिराच्या भिंतीवर ‘जिझस एकमेव देव आहे’ असे लिहिले !

  • भारतातील मंदिरांचे रक्षण न करणारे भाजप सरकार अमेरिकेतील मंदिरांच्या रक्षणासाठी काही करील, याची अपेक्षाच नाही. हिंदूंनो, आता जगभरातील मंदिरांचे रक्षण करण्यासाठी संघटित व्हा !
  • अमेरिकेत हिंदूंच्या मंदिरात घुसून तोडफोड होते; मात्र भारतातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना याचा निषेध करत नाही ! जगभरात एखाद्या मशिदीवर असे अन्य धर्मियांनी आक्रमण केले असते, तर सर्वत्र हिंसाचार झाला असता !
  • मंदिरातील मूर्तींचे विद्रुपीकरण करून तेथील भिंतींवर जिझसचा उदोउदो करणारे कोणत्या पंथाचे आहेत, हे हिंदू जाणून आहेत !

वॉशिंग्टन – अमेरिकेतील केन्टुकी प्रांतातील लुइसविले शहरात असणार्‍या स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांनी घुसून तोडफोड केली. त्यांनी मंदिरातील देवांच्या मूर्तींवर काळा रंग फासला. तसेच मुख्य दालनात असलेल्या खुर्च्या तोडल्या. मंदिराच्या भिंतीवर विचित्र चित्र काढून आक्षेपार्ह लिखाणसुद्धा लिहिले.

(ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)

यात ‘जिझस एकमेव देव आहे’, असेही लिहिले आहे. या घटनेची माहिती २ दिवसांनंतर मिळाल्यावर पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले.


Multi Language |Offline reading | PDF