पाकिस्तानची निर्मिती होऊन ७१ वर्षे झाल्यानंतर असा निर्णय घेतला जातो, यावरून पाकमध्ये हिंदूंना मानाचे पद मिळत नाही, हे भारतातील पाकप्रेमी नसीरुद्दीन शाह आणि अन्य लक्षात घेतील का ?
इस्लामाबाद – इस्लामी देश असणार्या पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच सुमन कुमारी या हिंदु अधिवक्त्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी राना भगवान दास हे पाकिस्तानमधील हिंदु धर्मियांतील पहिले न्यायाधीश ठरले होते. त्यांनी २००५ ते २००७ या काळात मुख्य न्यायाधीश म्हणून कामगिरी बजावली होती.
न्या. सुमन कुमारी या कम्बर-शाहददकोट येथील रहिवासी आहेत. हैदराबाद आणि कराची विद्यापिठातून सुमन कुमारी यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुमन यांचे वडील पवन कुमार बोदन हे डॉक्टर आहेत. सुमन यांची एक बहिण इंजिनिअर तर दुसरी सी.ए. आहे. सुमन या लता मंगेशकर यांच्या खूप मोठ्या प्रशंसक आहेत.