मध्यप्रदेशात प्रजासत्ताकदिनी ‘गदर’ चित्रपटातील गाण्यावर नृत्य करणार्‍या मुलांवर धर्मांधांचे सशस्त्र आक्रमण

  • काँग्रेसचे राज्य आल्यावर हिंदूंवर काय स्थिती ओढवते, हे हिंदू आतातरी लक्षात घेतील का ?
  • अशा घटनांवर प्रसारमाध्यमे आणि असहिष्णुतेविषयी छाती बडवणारे तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • ‘गदर’ चित्रपटामध्ये शीख युवक आणि पाकिस्तानी मुसलमान युवती यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील शीख युवक हा प्रखर राष्ट्राभिमानी दाखवण्यात आला आहे. त्यामुळे पाकप्रेमी धर्मांधांचा या चित्रपटावर आक्षेप आहे.

राजगड (मध्यप्रदेश) – येथील खुजनेर शहरामध्ये प्रजासत्ताकदिनाच्या वेळी आयोजित कार्यक्रमामध्ये शाळेतील मुलांनी ‘गदर’ चित्रपटातील गाण्यावर नृत्य केले. यामुळे येथे उपस्थित धर्मांधांनी देशविरोधी घोषणा देत त्यांच्यावर शस्त्रांसहित आक्रमण करून त्यांना मारहाण केली. तसेच येथे तोडफोडही केली गेली. या आक्रमणात अनेक मुले घायाळ झाली. त्यानंतर पोलिसांनी येथे कलम १४४ लागू केले. तसेच १६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून समद खान, साकिर खान, अकबर खान, जाकिर खान, इम्तियाज खान आणि समीर खान या ६ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

या घटनेमुळे मुसलमान विक्रेत्यांना येथील गावांमध्ये प्रवेशबंदी करण्यात यावी, अशी मागणी करणारी पत्रे पोलिसांना पाठवण्यात आली आहेत. ‘जर मुसलमान विक्रेते गावात आले, तर पुढे होणार्‍या परिणामांना आम्ही उत्तरदायी रहाणार नाही’, असे पत्र पाठवणार्‍यांनी म्हटले आहे. पोलिसांनी मात्र अशी बंदी घालण्याची मागणी फेटाळली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now