भाजपने हिंदूंच्या सूत्रांवरून लोकसभा निवडणूक लढवल्यास दंगली होतील ! – अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेची माहिती

  • अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला जी माहिती मिळते, ती भारतीय गुप्तचर संस्थांना का मिळत नाही आणि मिळाली, तर सरकार जनतेला सतर्क का करत नाहीत ?
  • हिंदूंच्या सूत्रांवरून दंगल कोण करू इच्छितो, हे आता वेगळे सांगायला नको ! अशा हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात केंद्रातील आणि १७ राज्यांतील भाजप सरकार प्रतिबंधात्मक कारवाई का करत नाही ?

वॉशिंग्टन – भारतात भाजपने हिंदूंच्या सूत्रांवरून लोकसभेची निवडणूक लढवल्यास भारतात दंगली होऊ शकतात, असे अमेरिकेच्या एका गुप्तचर संस्थेने तिच्या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेतील नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक डॅन कोट्स

१. अमेरिकेतील नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक डॅन कोट्स यांनी म्हटले की, अफगाणिस्तानात जुलै मासात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. अशा वेळी तालिबान मोठ्या प्रमाणात आतंकवादी आक्रमणे करण्याच्या सिद्धतेत आहे. वर्ष २०१९ मध्ये दक्षिण आशियाई देशांमध्ये वाढती आतंकवादी आक्रमणे एक मोठे आव्हान ठरणार आहे. अमेरिकेतसुद्धा पाकिस्तान समर्थक असलेल्या आतंकवादी संघटना आक्रमणाच्या सिद्धतेत आहेत. या सर्वच आतंकवादी संघटना इतर देशांवर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर करतात.

२. कोट्स असेही म्हणाले की, पाकिस्तानच्या आतंकवादविरोधी मोहिमा नावापुरत्या आहेत. पाकने आतंकवादाच्या विरोधात प्रभावी कामगिरी केलेली नाही. केवळ पाकिस्तानला धोका असलेल्या आतंकवाद्यांवरच तेथील सैन्य आणि पोलीस कारवाई करत असतात. पाकने परदेशात आक्रमणे करणार्‍या आतंकवादी संघटनांवर दुर्लक्ष केले. त्याचाच फटका भारत आणि अमेरिका यांना बसू शकतो. (अमेरिकेला हे ठाऊक आहे, तर अमेरिका स्वतःहून पाकमध्ये घुसून कारवाई का करत नाही ? – संपादक)

३. या व्यतिरिक्त भारत आणि चीन यांचे आधीच बिघडलेले परराष्ट्रसंबंध अधिक बिघडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात तणाव वाढेल, असेही कोट्स यांनी सांगितले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now