‘भावसत्संगांमुळे मनाच्या स्थितीत कसा पालट होतो ?’, याविषयी आलेल्या अनुभूती

१. मनाची स्थिती पुष्कळ गोंधळलेली असतांना ‘भावप्रयोगात ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्या घरात येत आहेत’, हे ऐकल्यावर भाववृद्धी होऊन गुरुदेवांची प्रीती अन् कृपाशीर्वाद मिळाल्याचे जाणवणे

‘२९.६.२०१७ या दिवशी भावसत्संग चालू होण्यापूर्वी माझ्या मनाची स्थिती पुष्कळ गोंधळलेली होती आणि माझे मनही विचलित झाले होते. भावसत्संगात भावप्रयोग घेणारे साधक म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्या घरात येत आहेत.’’ त्या क्षणी माझी भाववृद्धी झाली आणि मला त्यांची प्रीती अन् कृपाशीर्वाद मिळत असल्याचे जाणवले. मी कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी नतमस्तक झालो. तेव्हा मला पुष्कळ आनंद होत होता, तसेच माझी साधनेची तळमळ वाढून माझा शरणागत भावही वाढला होता.

२. भावप्रयोगाच्या वेळी ‘श्रीकृष्ण आकाशातून पहात आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे आणि आतून हलके अन् शांत वाटणे

२०.७.२०१७ या दिवशी भावसत्संग चालू होण्यापूर्वी माझे मन अस्वस्थ होते. नंतर भावप्रयोग चालू झाल्यावर ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले. मला सूक्ष्मातून ढग आणि आकाश दिसून ‘श्रीकृष्ण आकाशातून माझ्याकडे पहात आहे’, असे दिसले. त्याला पहाताक्षणी माझी भावजागृती झाली. तेव्हा ‘मी आकाशातील शुद्ध हवा श्‍वासाद्वारे आत घेत आहे’, असे जाणवले. त्यामुळे मला आतून हलके, आनंदी आणि शांत वाटत होते.’

– श्री. आल्वरो गर्रीदो, व्हेेनेझुएला (३१.७.२०१७)

‘ईश्‍वर त्याच्या सोनेरी हातांनी सेवा करवून घेत आहे’, असे दिसून शांत आणि आनंदी वाटणे

‘८.६.२०१७ या दिवशी मी सेवा करतांना ‘ईश्‍वर सोनेरी रंगाच्या प्रकाशाने माझे रक्षण करत आहे’, असे मला जाणवले. ‘तो त्याच्या सोनेरी हातांनी माझ्या माध्यमातून सेवा करवून घेत आहे’, असे मला दिसले. त्या वेळी मला आनंदी आणि शांत वाटत होते. मला सेवेची संधी दिल्याबद्दल ईश्‍वराच्या चरणी मी कृतज्ञ आहे.’

– सौ. मारिया फेर्नांदा, ला पाझ, बोलिव्हिया.


Multi Language |Offline reading | PDF