(म्हणे) ‘भारताची हिंदु राष्ट्राकडे होत असलेली वाटचाल धोकादायक !’ – लेखिका नयनतारा सहगल

  • नयनतारा सहगल यांच्या कार्यक्रमाच्या नावाखाली जमलेल्या साहित्यिकांची हिंदुत्वावर आगपाखड !

  • (म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशहा, तर शिवसेना धर्मांध !’

  • लेखिका समिना दलवाई यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अश्‍लाघ्य भाषेत घोर अवमान !

हिंदु राष्ट्राच्या व्यापक संकल्पनेविषयी जाणून न घेता त्यावर टीका करणारे असे हिंदुद्वेषी लेखक, लेखिका, साहित्यिक त्यांच्या लेखनातून आणि साहित्यातून जनतेला दिशा काय देणार ? आज देशात सर्वत्र विविध ठिकाणी रस्ता अडवून मुसलमान नमाज पडतात, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे धाडस पोलिसांना होत नाही. उलट प्रतिदिन दंगली करून धर्मांध हिंदूंमध्ये दहशत निर्माण करतात, ते पोलिसांवरही हात टाकतात, तरी पोलीस निष्क्रीय असतात. तरी सेहगल यांना या देशात मुसलमान असुरक्षित वाटत असतील, तर त्यांना हिंदुद्वेषीच म्हणावे लागेल !

मुंबई, ३० जानेवारी (वार्ता.) – अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी व्यक्त केलेली चिंता ही केवळ त्यांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी नाही, तर प्रत्येक मुसलमानाच्या सुरक्षिततेसाठी आहे. येणार्‍या प्रत्येक दिवशी रस्त्यावर निर्दोष व्यक्ती मारल्या जात आहेत; कारण ते मुसलमान आहेत. मला हे पहावत नाही. यावर कुणी चित्रपट अभिनेते का बोलत नाहीत ? ते गप्प का रहात आहेत ? (याला इतरांना भडकावणे म्हणतात ! – संपादक) ही पुष्कळ धोकादायक वेळ आहे. अशा वेळी गप्प रहाणेही धोकादायक आहे. भारत कधीही हिंदु राष्ट्र नव्हता. (भारत हा प्राचीन काळापासून हिंदु राष्ट्र आहे. एवढा सामान्य इतिहासही ठाऊक नसेल, तर सेहगल यांनी बोलणे आणि लेखन बंदच केलेले बरे, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? – संपादक) जगाला विविध संस्कृतींची आवश्यकता आहे. (सहगलबाईंनी खुशाल विविध संस्कृतींच्या जगात जाऊन रहावे ! – संपादक) आम्ही सर्व हिंदुस्थानी आहोत. काही झाले, तरी आम्ही आमचे हिंदुस्थानत्व सोडणार नाही. भारताची हिंदु राष्ट्राकडे होत असलेली वाटचाल धोकादायक आहे, अशी दार्पोक्ती इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांनी केली. (आझाद मैदानातील दंगलीच्या वेळी धर्मांधांनी ‘अमरज्योत’वर लाथ मारली. त्या वेळी नयनतारा यांचे भारतीयत्व का जागृत झाले नाही ? नयनतारा सहगल यांच्यासारख्यांकडून जनतेची होणारी दिशाभूल थांबण्यासाठीच भारत हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

२९ जानेवारी या दिवशी शिवाजी मंदिर येथे साहित्यिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहगल बोलत होत्या. यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक हे पद आयत्या वेळी नाकारण्यात आल्याने याविषयी नयनतारा सहगल यांची क्षमा मागण्यासाठी काही साहित्यिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कवयित्री डॉ. प्रज्ञा पवार, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, लेखक प्रवीण बांदेकर, समिना दलवाई, कर्नाटक येथील गायक टी.एम्. कृष्णा आदी उपस्थित होते.

लेखिका समिना दलवाई यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर उपहासात्मक टीका, तर शिवसेनेला धर्मांध ठरवण्याचा प्रयत्न !

या कार्यक्रमातील चर्चासत्रात लेखिका समिना दलवाई यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपण महान समजतो; पण स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी संडासमधून पळाले’, असा उपहासात्मक उल्लेख करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्यांनी अवमान केला. त्यावर उपस्थित पुरो(अधो)गामी साहित्यिकांनी हसून दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणच्या सुभेदाराने आणलेल्या मुसलमान महिलेला साडी-चोळी देऊन सुखरूप घरी पाठवले. या प्रसंगाविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘इतिहासाची सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे संदर्भ सांगितले. (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील समिना दलवाई यांनी केलेली टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार होय ! – संपादक) ‘बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर शिवसेनेने मुंबईत दंगल घडवून मुसलमानांना लक्ष्य केले’, अशा आशयाचे विधानही समिना दलवाई यांनी केले. दंगलग्रस्त भागात अग्नीशमनदल येऊ नये; म्हणून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर लोळल्याचा उल्लेखही त्यांनी या वेळी केला. (मुंबईमध्ये दंगल घडवून हिंदूंची कत्तल करणार्‍या धर्मांधांविषयी समिना दलवाई गप्प का ? शिवसेना नसती, तर मुंबईमध्ये धर्मांधांनी हिंदूंना शिल्लक ठेवले नसते, हे सत्य हिंदू जाणून आहेत. त्यामुळे समिना दलवाई कोणाची दिशाभूल करत आहेत ? – संपादक) या वेळी समाजवादी लोकांनी लग्नपत्रिकेवर गणपतीचे चित्र छापणे, वैदिक पद्धतीने विवाह करणे आदी हिंदूंच्या धार्मिक गोष्टींचा उपहासात्मक उल्लेख केला. (हिंदुद्वेषी समाजवादी !  – संपादक)

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राला पाठिंबा देणार्‍या दुराग्रही लोकांकडून अल्पसंख्य लक्ष्य ठरत आहेत !’ – पुष्पा भावे

देशातील धार्मिक विविधता नष्ट करून सर्वांना एकाच धार्मिक धोरणात आणण्याच प्रयत्न होत आहे. देशात हिंदु नसलेल्या कोट्यवधी देशबंधूंना आक्रमक आणि शत्रू ठरवले जात आहे. केवळ निधर्मी राज्यव्यवस्थाच सर्वांना सर्वसमावेशक छाया देऊ शकते. यामध्ये प्रत्येकाला स्वत:च्या श्रद्धेने ईश्‍वरप्राप्तीचा अधिकार असेल. हिंदु राष्ट्राला पाठिंबा देणार्‍या दुराग्रही लोकांकडून अल्पसंख्य लक्ष्य ठरत आहेत. (धर्मांधांनी किती हिंदूंना लक्ष्य केले आणि हिंदूंनी किती अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले, याची आकडेवारी पुष्पा भावे यांनी सांगावी ! – संपादक) कलेवर नियंत्रण आणणे, हे हुकूमशाहीचे लक्षण आहे. मागील काही वर्षांत महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे केवळ बुद्धीप्रामाण्यवादी असल्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. अनेक चित्रपट निर्मात्यांना धमक्या देण्यात आल्या. गोहत्या आणि गायीचे मांस खाणे यांच्या अफवांच्या आधारे मुसलमानांवर आक्रमण होत आहे. ही स्थिती महाराष्ट्राला लज्जास्पद आहे. (वरील पुरोगामी मंडळींनी केलेले हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन आणि राष्ट्रद्रोह यांविषयी पुष्पा भावे कधी का बोलत नाहीत ? धर्मांध लक्षावधींच्या संख्येत गोहत्या आणि हिंदूंच्या हत्या करत आहेत. काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागले. साम्यवादी हिंदूंच्या हत्या करीत आहेत, याविषयी भावेबाई का बोलत नाहीत ? हा बहुसंख्य हिंदूंवरील अन्याय आहे, असे भावेबाईंना वाटत नाही का ? – संपादक)

(म्हणे) ‘गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारले जाणारे देशद्रोही आणि मारणारे देशभक्त ठरवले जात आहेत !’ – लेखक जयंत पवार

गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एका गरीब मुसलमान तरुणाला जाळणारा आणि जळीताचा व्हिडिओ प्रसारित करणारे असे दोन्ही बाजूचे गरीबच आहेत; मात्र इथे मृत्यू झालेल्याला देशद्रोही ठरवले जाते, तर मारणार्‍याला देशभक्त मानले जाते. आज असत्याचा आवाज मोठा झाला आहे. (खरे आहे. सत्याचा आवाज असता, तर आजपर्यंत हिंदूंवर झालेला अन्याय बाहेर आला असता आणि जयंत पवार यांच्यासारखे पुरो(अधो)गामी लेखक त्याविषयी बोलले असते ! – संपादक) आज सत्यापेक्षा श्रद्धा आणि भावना यांनाच मानतात. अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वसमावेशक असल्याचा दावा केला जातो, तसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सर्व जातींना सामावून घेऊन सर्वसमावेशक असल्याचा दावा करतो; मात्र या संस्थांचा मूळ ढाचा वेगळा असतो. (साम्यवाद्यांचा मूळ ढाचा काय आहे, हे लेखक जयंत पवार यांनी जाणून घ्यावे. साम्यवाद्यांनी जगभरात केलेल्या लक्षावधी हिंसांची आकडेवारी समोर आणली, तर लेखक जयंत पवार यांना त्यावर बोलण्याचे धैर्य होईल का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF