प्रयागराज (कुंभनगरी) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला श्री अभिषेक महाराज यांची सदिच्छा भेट

कुंभमेळा प्रयागराज २०१९

श्री अभिषेक महाराज (उजवीकडे) यांच्याशी संवाद साधतांना डावीकडून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी), ३० जानेवारी (वार्ता.) – दरबार श्री पिंडोंरी धामचे श्री अभिषेक महाराज यांनी २७ जानेवारीला येथील कुंभमेळ्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म या विषयावर संवाद साधला.


Multi Language |Offline reading | PDF