कुंभमेळ्यात घातपाताचे कारस्थान रचणार्‍या संशयित आतंकवाद्यांना पकडल्यानंतर संतांनी आखाड्यांत अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

हिंदु राष्ट्रातील कुंभमेळा आतंकवादमुक्त असेल !

प्रयागराज (कुंभनगरी), ३० जानेवारी (वार्ता.) – येथील कुंभमेळ्यात घातपाताचे कारस्थान रचणार्‍या इसिसच्या ८ संशयित आतंकवाद्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील विविध आखाड्यांतील संतांनी आखाडा आणि भाविक यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. ज्या आखाड्यात पूर्वी काही सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, आता त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच आखाडा, प्रवचन, सत्संग आणि पूजन चालू असतांना सुरक्षितता अन् देखरेख यांसाठी स्वयंसेवकांची संख्याही वाढवण्यात आली आहे. कुंभमेळ्यात पूर्वीपासूनच पोलीस आणि कमांडो तैनात करण्यात आले आहेत. आता शिबिरांच्या बाहेरही मोठ्या संख्येने सुरक्षारक्षक तैनात झाले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF