कार्यशाळेशी संबंधित सेवा करतांना ऑस्ट्रिया, युरोपमधील श्री. अद्रियन डूर् यांना आलेल्या अनुभूती

कार्यशाळेशी संबंधित सेवा करतांना दैवी सुगंध येणे आणि रात्री ‘वास्तूतील स्पंदने अधिक सकारात्मक झाली असून नामजप सहजतेने होत आहे’, असे जाणवणे

श्री. अद्रियन डूर्

‘८.७.२०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेतलेल्या कार्यशाळेला विदेशातून काही जिज्ञासू उपस्थित होते. कार्यशाळेतील मार्गदर्शन इंग्रजी भाषेत असल्याने मी त्या जिज्ञासूंना इंग्रजीचे जर्मन भाषेत भाषांतर करून सांगत होतो. त्या वेळी ‘मी वापरत असलेल्या मायक्रोफोनला अकस्मात दैवी सुगंध येत आहे’, असे मला जाणवले. प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीही उदबत्ती किंवा अत्तर लावले नव्हते.

त्या रात्री आम्ही रहात असलेल्या वास्तूतील स्पंदनांमध्येही मला पुष्कळ पालट जाणवले. ‘पूर्वीच्या तुलनेत वास्तूतील स्पंदने अधिक सकारात्मक झाली असून माझा नामजप सहजतेने होत आहे’, असे मला जाणवले. यावरून ‘कार्यशाळेला उपस्थित राहिल्यामुळे अन् सेवा केल्यामुळे किती प्रमाणात सकारात्मकता निर्माण झालेली असते’, हे माझ्या लक्षात आले.’

– श्री. अद्रियन डूर्, ऑस्ट्रिया, युरोप. (८.७.२०१८)

‘साधक साधनेसाठी करत असलेले प्रयत्न म्हणजे गोवर्धन पर्वत उचलल्याप्रमाणे असून देवच तो उचलत आहे’, याची जाणीव देवानेच करून देणे

‘२५.१०.२०१७ या दिवशी मी नामजपादी उपाय करत असतांना देवाच्या कृपेने माझ्या मनात पुढील विचार तीव्रतेने आले. ‘माझी आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी मी साधनेअंतर्गत जे काही प्रयत्न करतो, ते म्हणजे गोवर्धन पर्वत उचलण्यासारखे आहे. प्रत्यक्षात देवच तो पर्वत उचलतोे. (म्हणजे माझी आध्यात्मिक उन्नती करून घेत असतोे.) या कार्यात माझा हातभार लागावा किंवा मी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम व्हावा, एवढी माझी क्षमताच नाही. देवाच्या कृपेमुळेच तो पर्वत उचलला जात आहे आणि देवाची कृपा संपादन करण्याची माझी तळमळही केवळ त्याच्यामुळेच आहे. तो (देव) प्रीतीने ओतप्रोत भरलेला असून त्याच्या प्रीतीमुळेच मी त्याच्याकडे ओढला जात आहे.

देवच अवतार घेऊन आणि विविध लीला करून त्या माध्यमातून आमच्यामध्ये भाव निर्माण करतो अन् चैतन्याचा वर्षाव करतो. त्यासाठी मी त्याच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अद्रियन डूर्, ऑस्ट्रिया, युरोप. (२५.१०.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF