माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

नवी देहली – माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे २९ जानेवारीला सकाळी येथील मॅक्सकेअर रुग्णालयात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेली अनेक वर्षे ते आजारी  होते. कामगार नेते, तसेच विविध मागण्यांसाठी मुंबई बंद करणारे नेते म्हणून ते ओळखले जात होते. जॉर्ज फर्नाडिस वर्ष १९७३ मध्ये ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली ८ मे १९७४ या दिवशी मुंबईत रेल्वे कामगारांचा संप झाला. या आंदोलनामुळे जॉर्ज फर्नांडिस यांना ‘लढवय्या कामगार नेता’ अशी ओळख मिळाली. आणीबाणीला त्यांनी प्रखर विरोध केला होता. त्या वेळी त्यांनी कारागृहातून निवडणूक लढवली होती.


Multi Language |Offline reading | PDF