‘अमेरिकी हिंदु’ होण्याचा मला अभिमान ! – अमेरिकेतील पहिल्या हिंदु महिला खासदार तुलसी गबार्ड

भारतातील किती राजकारणी ‘मी हिंदु आहे’, असे अभिमानाने सांगतात ?

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये (संसदेमध्ये) निवडून येणारी मी पहिली अमेरिकी हिंदु महिला असण्याचा आणि राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत असणारी पहिली हिंदु अमेरिकी असण्याचा मला अभिमान आहे, असे वक्तव्य अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी केले. त्यांच्यावर ‘हिंदु राष्ट्रवादी’ असल्याची टीका करणार्‍या विरोधकांना प्रत्युत्तर देतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तुलसी गबार्ड यांनी काही वर्षांपूर्वी हिंदु धर्म स्वीकारला आहे.

तुलसी गबार्ड यांनी एका नियतकालिकाच्या संपादकीय लेखामध्ये लिहिले आहे, ‘मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर माझ्यावर टीका केली जाते; मात्र बराक ओबामा, हिलरी क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, तसेच अन्य खासदार या गैर हिंदु नेत्यांनी मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमवेत कामही केले, तेव्हा कोणीच काही बोलले नाही. हा दुटप्पीपणा आहे. यातून केवळ धर्मांधताच निर्माण होते. माझ्या अमेरिकेविषयीच्या कटीबद्धतेवर प्रश्‍न निर्माण करणे हाही दुटप्पीपणा आहे. मला ‘हिंदु अमेरिकी’ म्हणणारे उद्या ‘मुसलमान अमेरिकी’, ‘ज्यू अमेरिकी’, ‘जपानी अमेरिकी’ असे इतरांना म्हणणार आहेत का ?’, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.


Multi Language |Offline reading | PDF