श्री सिद्धीविनायक मंदिरामध्ये दर्शन प्रवेशिकेच्या शुल्कामध्ये दुपटीने वाढ

‘मंदिर सरकारीकरण आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळे मंदिरांचे बाजारीकरण होत आहे’, असे भक्तांना वाटल्यास चूक ते काय ?

मुंबई, २९ जानेवारी (वार्ता.) – प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध देवस्थान श्री सिद्धीविनायक मंदिरामध्ये प्राधान्याने दर्शन मिळावे, यासाठी प्रवेशिका काढून ती घेणार्‍यांना स्वतंत्रपणे दर्शन घेण्याची सुविधा देवस्थानकडून चालू आहे. यापूर्वी ५० रुपये इतके असलेले प्रवेशिकेचे शुल्क मागील आठवड्यापासून १०० रुपये इतके करण्यात आले आहे.

प्रवेशिका काढून दर्शन घेणार्‍यांना प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून मंदिरात सोडले जाते. ज्येष्ठ नागरिक आणि विकलांग व्यक्ती यांना मात्र या रांगेतून कोणत्याही प्रकारे शुल्क न आकारता प्रवेश दिला जातो. मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे सर्व भाविकांसमवेत रांगेत उभे राहून दर्शन घ्यायला किमान १ घंटा तरी वेळ लागतो; मात्र प्रवेशिका काढून दर्शन घेतल्यास किमान अर्ध्या घंट्यामध्ये दर्शन मिळते. तातडीने दर्शन हवे असल्यास आणि वेळ उपलब्ध नसल्यास देवस्थानच्या वतीने ही विशेष सुविधा चालू करण्यात आली आहे. (वृद्ध, गर्भवती महिला, रुग्ण, विकलांग यांच्यासाठी वेगळी सुविधा करणे हे समजण्यासारखे आहे; मात्र अशा प्रवेशिका घेणार्‍यांची गर्दी वाढल्यास रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना आणखी वेळ लागू शकतो. पूर्वीच्या काळात राजे वेळ काढून आणि राजेशाही थाट बाजूला ठेवून वनामध्ये जाऊन ऋषींचे दर्शन घ्यायचे. पैसे भरून देवाचे दर्शन घेण्याची चालू करण्यात आलेली प्रथा व्यवहारिक नसून श्रद्धेचा बाजार मांडणारी आहे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now